मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७६ कोटी रूपयांची तरतूद

प्रत्येक वॉर्डच्या क्षेत्रातील झोपडपट्टीतील मुलभूत सोयी सुविधांच्या विकासावर भर देणार; पालकमंत्री मंगल प्रभात लोढांची माहिती

    12-Jul-2023
Total Views | 60
Mumbai suburbs District Development Fund
 
मुंबई : प्रत्येक वॉर्डच्या कार्य क्षेत्रातील झोपडपट्टीत रस्ते काँक्रिटीकरणाबरोबरच मुलभूत सोयी - सुविधांचा विकास करण्याला प्राधान्य देण्यात येणार असून , दोन हजार महापालिकांच्या शाळांमध्ये जीम उभारण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. दरम्यान, मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन २०२३-२४ मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ९२०.०० कोटी रूपये, अनुसूचित जाती उपयोजना ५१.०० कोटी रूपये व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (ओटीएसपी) अंतर्गत ५.७१ कोटी रूपये असा एकूण ९७६.७१ कोटी रूपयांचा निधी अर्थसंकल्पित झाला असून ही कामे गतीने करणार असल्याचे लोढांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, उपनगर जिल्हा समितीची बैठक चेतना महाविद्यालय येथे पार पडली. या बैठकीत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. ते म्हणाले, झोपडपट्टीवासियांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी यावेळी भर देण्यात आला असून प्रामुख्याने झोपडपट्टी भागातील मुलभूत सुविधा जसे की अंतर्गत रस्ते, ड्रेनेज सिस्टीम, पाणी पुरवठा, विद्युत व्यवस्था, सार्वजनिक जमिनीवर खेळाची मैदाने, आंगणवाड्यांची स्थापना, उद्यानांची निर्मिती, अशा प्रकारच्या कामे तसेच झोपडपट्टी भागातील बेरोजगारांसाठी कौशल्य विकास, आरोग्य सुविधांचा विकास इत्यादी प्रकल्प हाती घेण्यात येतील, असे लोढांनी सांगितले.

पर्यटन विकासासाठी मुलभूत सुविधांकरीता ६५ कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली असून यामध्ये गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला दिलेल्या जागेवर विविध पर्यटन विकासाचे प्रकल्प ,भांडूप फ्लेंमिगो पार्क येथे पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा पुरविणे,पुर्व उपनगरातील खाडी किना-यांवर पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा पुरविण्यात येतील असे यावेळी लोढांनी सांगितले.
 
दरम्यान, मनपा, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेरी टाईम बोर्ड, पत्तन अभियंता इ. यंत्रणांना सुपूर्द करण्यात आला आहे. सन २०२२-२३ मध्ये हाती घेतलेल्या कामांचा योजनानिहाय व कामनिहाय अहवाल आजच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील योजनांतर्गत मोठ्याप्रमाणावर नागरी सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

यावेळी या बैठकीला खासदार गोपल शेट्टी, खासदार राहुल शेवाळे,आमदार ॲड. अनिल परब,अमित साटम,अतुल भातखळकर,डॉ.भारती लव्हेकर,ऋतुजा लटके,ॲड. पराग अळवणी, दिलीप लांडे,मिहीर कोटेच्या,योगेश सागर,सुनील प्रभू,रमेश कोरगावकर, विलास पोतनीस, सुनील राणे, मनीषा चौधरी,प्रकाश फातर्पेकर,मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,महानगरपालिकेचे अतिरिक्त मुंबई महानगरपालिका आयुक्त पी.वेलारासू,अश्विनी भिडे यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121