मशिदीत राहायला जागा दिली नाही; मग मोहम्मद अन्वरने, 'मशिदीत बॉम्ब....'

    11-Jul-2023
Total Views | 524
Man arrested for hoax bomb call to mosque in Bengaluru Shivajinagar


बेंगळुरू
: कर्नाटक पोलिसांनी ३७ वर्षीय सय्यद मोहम्मद अन्वर याला अटक केली आहे. बेंगळुरूमधील मशिदीवर झालेल्या दहशतवादी हल्ला होणार असल्याची खोटी माहिती पसरवल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. त्यांने मशिदीत बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगितले होते. पोलिसांनी संपूर्ण मशिदीची झडती घेतली मात्र कुठेही बॉम्ब सापडला नाही. अखेर ही माहिती देणाऱ्या अन्वरचा शोध घेण्यात आला. आणि १० जुलै रोजी त्याला अटक करण्यात आले. चौकशीत त्याने मशिदीत राहण्याची सोय नसल्यामुळे खोटी माहिती पसरवल्याचे सांगितले.

तसेच सय्यद मोहम्मद अन्वर हा मदरसा चालवण्याच्या नावाखाली लोकांकडून देणगी गोळा करतो. ५ जुलै रोजी तो बेंगळुरूच्या शिवाजी नगर भागात असलेल्या आझम मशिदीतही पोहोचला. तिथे त्यांने मशीद समितीकडे राहण्यासाठी जागा मागितली. मात्र मशिदीच्या कर्मचाऱ्यांनी त्याला तेथे राहण्यास नकार दिला. या गोष्टीचा राग आल्याने त्यांने बेंगळुरू येथील मॅजेस्टिक बसस्थानकावरून बस पकडली आणि आंध्र प्रदेशातील कर्नूलला जाण्यासाठी बसमध्ये चढला. त्यानंतर, बस बेंगळुरूच्या बाहेरील देवनहल्लीजवळ आल्यावर त्याने पोलिस हेल्पलाइन क्रमांक ११२ वर कॉल केला. आणि दहशतवाद्यांनी मशिदीत बॉम्ब ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांने ही सर्व माहिती उर्दूमध्ये दिली.

मशिदीत बॉम्ब असल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस, अग्निशमन दल, आपत्कालीन सेवा, बॉम्ब निकामी पथक, श्वान पथकासह सर्व यंत्रणा सक्रिय होऊन घटनास्थळी पोहोचल्या. मशिदीत झाडाझडती करण्यात आली. आजूबाजूच्या परिसराचीही तपासणी करण्यात आली. पण काहीही सापडले नाही. यानंतर पोलिसांनी शोधमोहीम थांबवून फोन करणाऱ्याचा शोध सुरू केला.
 
आरोपीने बेंगळुरूच्या बाहेरून फोन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. तसेच तपासादरम्यान ज्या फोनवरून कॉल करण्यात आला त्याचे लोकेशन हैदराबादचे असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी फोन ट्रॅक करून आरोपींना अटक करण्यासाठी एक टीम तयार केली होती. अनेक ठिकाणी छापे टाकल्यानंतर फोनचे लोकेशन आंध्र प्रदेशातील कर्नूलमध्ये सापडले. मात्र नंतर लोकेशन बदलले आणि फोन तेलंगणातील महबूब नगर येथे ट्रॅक करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी अन्वरला मेहबूब नगर येथून अटक केली. मोहम्मद अन्वर हा महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे चौकशीत समोर आले.




 
अग्रलेख
जरुर वाचा
ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

११ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा हा मोठा गौरव आहे. मात्र याचबरोबर पोर्तुगीजांच्या जुलमी जोखडातून वसई प्रांताला मुक्त करणाऱ्या नरवीर  चिमणाजी अप्पा यांच्या साहसी शौर्याची परिसीमा असलेल्या मुंब‌ईपासून अगदी हाकेच्या अंतरावरील वसईच्या ऐतिहासिक किल्लाचा देखील जागतिक वारसा यादीमध्ये समावेश व्हावा यासाठी वसईतील सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवप्रेमीनितीन म्हात्रे यांनी ..

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

नायगांव पूर्व विभागातील जुचंद्र गावात (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यालयात जुचंद्र परिसरातील नव्याने तयार केलेल्या महिला बचत गटासाठी पहिल्यांदाच मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्याहर्षलाप्रविण गावडे यांनी आयोजन केले होते. ह्या महिला बचत गटाच्या मार्गदर्शन शिबिराला वसई पूर्व दक्षिण मंडळाचे अध्यक्ष उदय शेट्टी, अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121