समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हेल्सनं प्रवास करणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी!

    10-Jul-2023
Total Views | 1401
Samrudhi Highway RTO Officer Checking Travels

मुंबई
: राज्यात समृध्दी महामार्गावर घडणाऱ्या अपघातांच्या मालिकांमुळे आता राज्य शासनाकडून नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे समृध्दी महामार्गावर जाणाऱ्या बसगाड्यांची पडताळणी केली जात आहे. दरम्यान, "आरटीओ" अधिकाऱ्यांनी केलेल्या बसगाड्यांच्या पडताळणीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
दरम्यान, समृद्धी महामार्गावरील दुर्घटनेनंतर सोलापूर ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोल नाका, बार्शी रोड, मंगळवेढा रोडवरून पुणे-मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसगाड्यांची पडताळणी केली असून यावेळी "आरटीओ" अधिकाऱ्यांना धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या आहेत. तसेच, अधिकाऱ्यांनी यादरम्यान ९४ गाड्यांवर कारवाई करीत तीन लाख ३२ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
 
तसेच, आरटीओने तपासलेल्या २१४ ट्रॅव्हल्सपैकी ४३ गाड्यांमध्ये अग्निशमन यंत्रेच नसल्याचे उघडकीस आले असून गाड्यांमधील काही यंत्रे मुदतबाह्य झाल्याचे समोर आले आहे. तसेच, ९ ट्रॅव्हल्सचे इमर्जन्सी दरवाजे कायमचे लॉक होते. तर अन्य ३३ गाड्यांमध्ये प्रथमोपचाराची सोय नसल्याचे अधिकाऱ्यांच्या पडताळणीत निष्पन्न झाले.

दरम्यान, दि. ६ जुलै रोजी समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ विदर्भ ट्रॅव्हल बसचा अपघात होऊन यात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. तसेच, या अपघातानंतर राज्य सरकारकडून तज्ज्ञांची समितीदेखील नेमण्यात आली होती.


 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121