रुग्णाची चैतन्यशक्ती जशी कमकुवत होते, तसे त्याला आजार किंवा रोग होतो. ही रोगाची स्थिती माणसाच्या 'state of disposition' वर अवलंबून असते. म्हणूनच मास्टर हॅनेमान त्यांच्या ‘ऑरगॅनॉन’मध्ये २११व्या परिच्छेदात लिहितात की,""This holds true to such an extent that the state of disposition often chiefly determines the choice, and homoeopathic remedy.''
सुदैवाने होमियोपॅथिक मटेरीया मेडिकामध्ये प्रत्येक औषधाची सिद्धता करताना सिद्धकर्त्याची शारीरिक व मानसिक लक्षणे पूर्ण विस्ताराने नोंद करून ठेवलेली असतात. त्यामुळे रुग्णाच्या मानसिक व शारीरिक स्थिती समजण्यास फार सहज होते. त्यामुळे रुग्णाची मानसिक स्थितीची लक्षणे व शारीरिक स्थितीची लक्षणे ही औषधाच्या या लक्षणांबरोबर पडताळून पाहिली जातात व आजाराला ‘सम’ अशी औषधे शोधली जातात
.
डॉ. हॅनेमान २१२व्या परिच्छेदात लिहितात- The creator of therepeutic agents has also had particular regard to this main feature of all diseases, the altered state of disposition and Mind, for there is no powerful medicinal substance in the world which does not very notably alter the state of disposition and mind in the healthy individual who tests it, And every medicine does so in a different manner.''
वरील शब्दांत डॉ. हॅनेमान यांनी मानसिक स्थितीचे महत्त्व सांगितले आहे.
आता ही मानसिक स्थिती कशी ओळखायची? तर त्यासाठी सर्वप्रथम रुग्णाची सखोल केस टेकिंग गरजेची असते. आपल्या समस्या सांगत असताना व स्वभावविशेष तसेच शारीरिक लक्षणे सांगत असताना, रुग्ण अनेक शारीरिक व मानसिक लक्षणे सांगत राहतात. अशा अनेक लक्षणांना समोर ठेवून ती लक्षणे कुठल्या मानसिक स्थितीकडे निर्देश करतात, ती मानसिक स्थिती शोधावी लागते. उदाहरणार्थ, माझ्या क्लिनीकमध्ये एक मुलगी थायरॉईडच्या उपचारासाठी आली, तिची सर्व लक्षणे व समस्या जाणून घेतल्यावर तिचा मुख्य प्रॉब्लेम ‘एरीया’ कळला. ही मुलगी नुकतीच लग्न होऊन सासरी आली होती व माहेरी असताना तिला तिच्या आई-वडिलांनी एखाद्या राजकन्येसारखे वाढवले होते. शिस्त व सर्व व्यवहारज्ञानही शिकवले होते.
तिला तिच्या प्रत्येक कामाबद्दल, प्रगतीबद्दल भरपूर कौतुकाचे बोल ऐकायला मिळायचे. ती शिक्षणातही ‘टॉपर’ होती. लग्न होऊन सासरी आली तेव्हा सासरची माणसेही चांगली होती. परंतु, खूप वर्चस्व गाजवणारी व स्वत:चेच कौतुक करण्यात ही माणसे मग्न असत. त्यामुळे एकदम खेळकर व आनंदी वातावरणातून आलेल्या या मुलीला कौतुकाचे बोल कधी ऐकायलाच मिळाले नाहीत व इतर लोकांचीच कौतुके ऐकायला मिळाली. परिणामी, कौतुक करून घेण्यासाठी ही मुलगी कुटुंबातील सर्वांना खूश ठेवण्याचा आटापिटा करू लागली. तरीही काम न झाल्यानंतर मात्र तिची चिडचिड होऊ लागली व तिला थायरॉईड झाला. या मुलीची मुख्य मानसिक स्थिती ही कौतुकाचा, वाखाणणीचा अभाव-(Lamenting because she was not appreciated) अशी होती. त्यानुसार फक्त होमियोपॅथीमध्येच औषध उपलब्ध होते. ते तिला दिले व ती बरी झाली. मानसिक स्थितीही म्हणूनच परिस्थितीवरही अवलंबून असते.
डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
९८६९०६२२७६