मुंबई : संजय राऊत भांडूपचा देवानंद. असं म्हणत भाजप आमदार नितेश राणेंनी टोला लगावला आहे. शिवाय छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी, "मी छत्रपती संभाजीनगर म्हणणार नाही, औरंगाबादच म्हणणार." असे म्हटले होते. या वक्तव्याचा देखील राणेंनी समाचार घेतला आहे. संजय राऊतांमध्ये हिंमत आहे का शरद पवार साहेबांना सांगण्याची की, बाळासाहेब ठाकरेंची मागणी होती औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करा? असं नितेश राणे म्हणालेत. तसंच जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांच्यावरही नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे.
राणे म्हणाले, "संजय राऊतमध्ये हिंमत आहे का पवार साहेबांना सांगण्याची. बाळासाहेब ठाकरेंची मागणी होती औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्याचे. हे शरद पवारांना सांगण्याची हिंमत आहे का? मुंब्य्राच्या आमदारांनी महाराष्ट्रात दंगली होण्याचे भाष्य केलं होतं. दोन तीन महिन्याअगोदर जितेंद्र आव्हाडांना कसं कळलं होतं? कोल्हापूरच्या नेत्याला कसं कळलं की दंगली होणार आहेत? आव्हाडांच्या मतदरसंघात 400 लोकांना धर्मांतर करताना पकडलं. यावर अग्रलेख लिही. ज्यांना साधं संभाजी म्हणता येत नाही त्यावर तुम्हाला आक्षेप घेता येत नाही."
"अबू आझमीने औरंगजेबाला मानतो अस वक्तव्य केलं. जाहीरपणे गवगवा करतोय.तुला थुंकण्याची सवय आहे ना मग अबू आझमीवर थुंकून दाखव. काल मोठी घटना घडली आहे. नंदकिशोरवर रेड पडली आहे. तुझ्या मालकाने ज्याच्याकडे खोके ठेवले आहेत, मातोश्रीचा दुसरा खरा मालक हा आहे. तो गायब आहे की त्याला लपवलं आहे याची माहिती उद्याच्या सामनातून दे. श्रीधर पाटणकर देश सोडण्याच्या तयारीत आहेत. म्हणून त्यांच्यावर लूक आऊट नोटीस काढावी. नंदकिशोरचे पैसे या पाटणकरकडे ठेवले आहेत."
" संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंचे पटत नाही. याचा पुन्हा एकदा पुरावा समोर आला आहे. संजय राऊत पण पगार भेटत नाही म्हणून जर शिंदेंना जाऊन भेटला तर त्यात आश्चर्य वाटणार नाही. यांच्या ढुंगणावर आदित्यने भवोजीना आणून बसवलंय. अमोल मिटकरीला कोणीही बाजारात विकत घेऊ शकतो. माझा चेक जर पोचला तर ते माझ्या बाजूने बोलतील. म्हणून अशा व्यक्तीवर बोलण उचित नाही." असा हल्लाबोल नितेश राणेंनी केला आहे.