बोरिवलीत महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत स्वयंरोजगाराला चालना
23-Jun-2023
Total Views | 30
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्यावतीने बोरीवली येथे महिलांच्या सक्षमीकरणाबाबत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी उपयुक्त साधने त्यांना यावेळी देण्यात आली. दरम्यान, बोरीवली विधानसभा व बृहन्मुंबई महानगरपालिका आर, मध्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने बोरिवली पश्चिम, शिंपोली रोड, गोखले हॉल येथे आयोजित महिला व बालकल्याण योजने अंतर्गत महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून स्वयंरोजगारांसाठीच्या शिलाई मशिन व घरघंटी वाटपाला उपस्थिती दर्शविली. यावेळी समाज विकास अधिकारी महेंद्र हेमराज गभणे देखील उपस्थित होते.