मुंबई : 'इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट'कडून एक सर्व्ह करण्यात आला असून त्यांनी जगातील जगण्यायोग्य आणि अयोग्य शहरांची यादी प्रसिध्द केली आहे. जगातील वाईट शहरांच्या यादीत सीरियातील दमास्कस हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील १७३ देशांच्या यादीत ढाका , कराची, हरारे आणि कीव ही शहरे यादीत पहिल्या दहा शहरांमध्ये आहेत. तसेच, जगातील राहण्यायोग्य शहरांच्या यादीत व्हिएन्ना आणि ऑस्ट्रियाला जगण्यासाठी सर्वोत्तम शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोपनहेगन, मेलबर्न आणि सिडनी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. १७२ देशांच्या यादीत व्हिएन्ना हे शहर सलग दुसऱ्यांदा पहिल्या क्रमांकावर आले आहे. तर दुसरीकडे जगण्याअयोग्य शहरांच्या यादीत बांग्लादेशमधील ढाका शहरांचे सलग दुसऱ्यांदा नाव नोंदवण्यात आले आहे.
दरम्यान, सलग दुसऱ्यांदा व्हिएन्ना, ऑस्ट्रियाला जगासाठी सर्वोत्तम शहर म्हणून घोषित करण्यात आले असताना ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स २०२३ ने व्हिएन्नाच्या यशाचे श्रेय "स्थिरता, चांगल्या पायाभूत सुविधा, मजबूत शिक्षण आणि आरोग्य सेवा आणि भरपूर संस्कृती आणि मनोरंजन यांच्या अतुलनीय कामगिरीला दिले आहे. तर दुसरीकडे डेन्मार्कची राजधानी कोपनहेगननेही यादीत दुसरे स्थान कायम राखले आहे. त्याखालोखाल मेलबर्न आणि सिडनी ही दोन ऑस्ट्रेलियन शहरे आहेत. या शहरांमध्ये साथीच्या रोगांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे निर्देशांकामध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. तसेच कोविडच्या साथीमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याचेदेखील अहवाल तज्ज्ञांनी सांगितले आहे.
इकॉनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिट (EIU) नेमकं करतं काय?
इकॉनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिट (EIU) हा द इकॉनॉमिस्ट ग्रुपचा संशोधन आणि विश्लेषण विभाग असून हा विभाग विविध देशांचे मासिक अहवाल, पाच वर्षांचा आर्थिक अंदाज, जोखीम सेवा अहवाल आणि उद्योग अहवाल यासारख्या संशोधन आणि विश्लेषणाद्वारे अंदाज आणि सल्लागार सेवा देत असते. तसेच, ईआययूद्वारे जगभरातील देश, उद्योग आणि व्यवस्थापन विश्लेषण प्रदान करण्याचे कार्य करते.