डॉ. नंदिनी देशमुख यांना ‘स्पिसीज अ‍ॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स’ जीवनगौरव पुरस्कार

डॉ. नंदिनी देशमुख ‘जीवनगौरव’ पुरस्काराच्या मानकरी

    02-Jun-2023
Total Views | 67
Species and Habitats Warriors Award

मुंबई
: दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’तर्फे ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या पूर्वसंध्येला, दि. ४ जून रोजी ‘स्पिसीज अ‍ॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड्स-२०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यात पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय डॉ. नंदिनी देशमुख ‘जीवनगौरव’ पुरस्काराच्या मानकरी कामगिरी करणार्‍या एकूण १३ पुरस्कारार्थींना गौरविण्यात येणार आहे. यावेळी पर्यावरणविषयक दीर्घकाळ लेखन आणि जनजागृतीमध्ये भरीव योगदान देणार्‍या डॉ. नंदिनी देशमुख यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

रविवार, दि. ४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईतील भायखळा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार हे प्रमुख अतिथी म्हणून या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. जलप्रक्रिया तज्ज्ञ आणि ‘एसएफसी एन्व्हायर्नमेंटल टेक्नोलॉजीज प्रा. लि.’चे व्यवस्थापकीय संचालक संदीप आसोलकर आणि राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे (भा.प्र.से) हे अतिथी म्हणून कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. ‘एसएफसी एन्व्हायर्नमेंटल टेक्नोलॉजीज प्रा. लि.’ हे या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ व ‘मिशन लाईफ’ हे सहप्रायोजक आहेत. या सोहळ्यासाठी ‘टेलिव्हिजन पार्टनर - झी २४ तास’, ‘रेडिओ पार्टनर - रेडिओ सिटी ९१.१ एफएम’ आणि ‘पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर’ (पार्क) हे ‘रिसर्च पार्टनर’ आहेत.

‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट’, ‘एपीसीसीएफ वाईल्डलाईफ पश्चिम मुंबई’, ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’, ‘महाराष्ट्र कांदळवन कक्ष’, ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ऑफ इंडिया’, ‘वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय’, ‘सह्याद्री निसर्ग मित्र’, ‘महाराष्ट्र पक्षी मित्र’, ‘वाईल्डलाईफ इमेजेस अ‍ॅण्ड रिफ्लेकशन्स’, ‘इंडियन युथ बायोडायव्हर्सिटी नेटवर्क’ आणि ‘नॅचरलिस्ट फाऊंडेशन’ या सहयोगी संस्थांनासोबत घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. नंदिनी देशमुख यांचा अल्पपरिचय

बालपणापासूनच वाचनाचे प्रचंड वेड असलेल्या आणि आजही पुस्तकांशी तितकीच घट्ट मैत्री जोपासलेल्या नंदिनी देशमुख यांनी त्यांच्या आजवरच्या प्राध्यापकीच्या पेशात अनेक विद्यार्थी घडवले. पर्यावरणासाठी पूर्णवेळ काम करता यावे, या उद्देशातून स्वेच्छानिवृत्ती पत्करलेल्या डॉ. नंदिनी देशमुख यांनी ‘रानातील गोष्ट, मनातील गोष्ट’, ‘मासे जाणून घेऊया’, ‘सजीवांची उत्पत्ती’ अशा पर्यावरणविषयक पुस्तकांचे लेखन केले आहे. सध्या त्या ‘अल गोर’ या हवामान बदलासाठी कार्यरत असलेल्या अमेरिकी संस्थेच्या भारतातील ‘कॉर्डिनेटर’ म्हणून काम पाहात आहेत. पर्यावरणाविषयी लेखन तसेच इतर माध्यमातून जनजागृती करण्यार्‍या डॉ. नंदिनी देशमुख यांना यंदाच्या ‘स्पिसीज अ‍ॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड्स २०२३’च्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.

अग्रलेख
जरुर वाचा
कल्याणमध्ये चिमुकल्यांची शाळा मालवाहतूक टेम्पोमधूनच सुरू

कल्याणमध्ये चिमुकल्यांची शाळा मालवाहतूक टेम्पोमधूनच सुरू

ना दरवाजे, ना अटेंडंट, ना सुरक्षा विद्यार्थी लोंखडीपट्टयांना धरून करतात प्रवास अंबरनाथ मधील अपघाताच्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले असतानाच कल्याणात एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून शाळेत ने-आण केली जात आहे. विशेष म्हणजे मुलांच्या सुरक्षिततेसाठी एक ही अटेंडंट (सहाय्यक) सोबत नाही. विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास सुरू असताना आरटीओच्या अधिकाऱ्याचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे अपघात झाल्यानंतरच जाग येणार का असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121