मुंबई : संभाजी ब्रिगेडचे नेते प्रकाश गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटेसह त्याच्या सहकाऱ्याला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवार, १५ जुलै रोजी अक्कलकोट न्यायालयाने हा निर्णय दिला.
मंगळवारी दीपक काटेसह आणखी एका आरोपीला दीपक काटे अक्कलकोट न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांकडून सात दिवसांची पोलिस कोठडी मागण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने दीपक काटेसह त्याच्या सहकाऱ्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नेमके प्रकरण काय?
संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावरअक्कलकोटमध्ये शाईफेक करत हल्ला करण्यात आला होता. संभाजी ब्रिगेड नावामध्ये छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख आहे, असा आरोप करत शिवधर्म फाउंडेशनचा अध्यक्ष दीपक काटेसह त्याच्या काही लोकांनी प्रविण गायकवाड यांच्यावर हा हल्ला केला होता. त्यानंतर दीपक काटेला पोलिसांकडून अटक करण्यात आली. दरम्यान, आता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.