मुंबईकरांसाठी मोठी बातमी! प्रकल्पग्रस्तांना मिळणार आवास योजनेतून घरे!

    13-Jun-2023
Total Views | 102
 
devendra fadnavis
 
 
मुंबई : कांदीवली पूर्व विधानसभा मतदार संघातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यात येतील, असे फडणवीसांनी झालेल्या बैठकीत दिले. घरा ऐवजी २५ ते ४० लाख रुपयांचा पर्यायही प्रकल्पग्रस्तांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी माहितीही त्यांनी दिली.
 
या बैठकीत भातखळकरांनी प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी विशेष नियोजन आराखड्यातील मागाठाणे गोरेगाव या १२० फूटी रस्त्याबाबतही चर्चा झाली. हा रस्ता येत्या एक ते दीड वर्षांत पूर्ण करण्याबाबतचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121