किनवट : नांदेड जिल्ह्यातील किनवटमधील गंगानगर येथे एका लग्नाच्या हळदी कार्यक्रमात गाणे वाजवल्यावरून दोन गटात तेढ निर्माण होऊन दगडफेक आणि हाणामारी झाली.यात अनेकांची डोके फुटले असून हाताला मार लागला आहे. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किनवट पोलीसांनी दोन्ही गटातील ११ जणांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही गटाविरूद्ध परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल केले आहेत.
१४ मे रोजी रात्री साडेदहा वाजता गंगानगर येथे लग्न समारंभ पूर्वी हळदीचा कार्यक्रम होता. डीजेवर गाणे वाजणे सुरु होते. तेवढ्यात इस्लामपुरा येथील दहा जण आले आणि गाणे का वाजवत आहेत, असे म्हणताच बाचाबाची झाली.त्यानंतर घटनास्थळी दगडफेक करण्यात आली. रम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली.