मुंबई : मुंबई महापालिकेकडून सुमारे साडेसहा कोटी रस्त्यावर खर्च करण्यात आले असून महापालिकेकडून केवळ बेसुमार खर्च करण्यात येत आहे, असे मंगळवार दिनांक १६ मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. तर पंचिवस वर्षे शिवसेनेने काय केले? असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई महापालिकेकडून सुमारे साडेसहा कोटी रस्त्यांसाठी खर्च करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा १०-१२ कोटी प्रत्येक वॉर्डला देण्यात आले. आणि आता पुन्हा खड्डे दुरुस्तीसाठी १-२ कोटी देण्यात आले आहेत. रस्त्याच्या निविदा वेगळ्या, रस्ते दुरुस्तीसाठी खर्च वेगळा, खड्डे बुजवण्यासाठी खर्च वेगळा मग मुंबई महापालिका रस्त्यांवर नक्की किती खर्च करणार आहे? असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. तसेच या खर्चाचे ऑडिट होणे गरजेचे असल्याचेही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
मुंबईची मागील २५ वर्षात जी वाट लावली आहे त्याची सिम्पथी मिळणार असे उद्धव ठाकरेंना वाटत आहे. लोकांसाठी शिवसेनेने पांचिवास वर्षात काय केले हा महत्त्वाचा मुद्दा यंदाच्या निवडणुकीचा असणार असल्याचेही मत संदीप देशपांडेंनी मांडले आहे. तर संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचा टोलाही यावेळी देशपांडेंनी लगावला आहे.