जंजिऱ्यावर पर्यटकांची तुडुंब हजेरी !

मुरूड तालुक्यात पर्यटकांची जत्रा

    08-Apr-2023
Total Views | 97

Murud Janjira Tourist Destination

मुरूड जंजिरा
: सलग जोडून आलेली तीन दिवसांची सुट्टी आणि पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्या ने राज्यातील पर्यटकांची पावले कोकणातील समुद्रकिनारे आणि जलदुर्ग पाहण्यासाठी वळली असून हाजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याचे ठिकठिकाणी माहिती घेताना कळत आहे.मुरूड चा ऐतिहासीक प्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग पर्यटकांच्या तुडुंब हजेरीने भरून गेल्याचे शनिवारी दिसून आले.राजपुरी जेट्टी आणि खोरा बंदर जेट्टीवर जंजिऱ्यात जाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी शनिवारी सकाळ पासून दिसत होती.पदमजलदुर्ग पाहण्यासाठी देखील मुरूड किनाऱ्यावरून यांत्रिक बोट सेवा सुरू आहे.

मुरूड तालुक्यातील काशीद, नांदगाव, मुरूड आदी समुद्रकिनारी पर्यटकांनी मोठी हजेरी लावली असून जत्रेचे स्वरूप आले आहे.काशीद समुद्रकिनारा शुक्रवार पासून पर्यटकांनी फुलून गेल्याची माहिती काशीद गावचे सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत जंगम यांनी शनिवारी दुपारी बोलताना दिली. दुरुस्तीसाठी साळाव ते रेवदंडा पूल बंद असूनही पर्यटकांनी रोहा- चणेरा, खारी, मिठेखार मार्गे काशीद, नांदगाव, मुरूड गाठले आहे.हा मार्ग ३५ किमी लांब अंतराचा असूनही सुमारे दीड हजार वाहने येथे आल्याची माहीती जंगम यांनी दिली.मुरूड मध्ये देखील सुमारे ५०० वाहनांतून आल्याची माहीती नगरपरिषद मुख्य टोल नाक्यावर देण्यात आली.मुरूड समुद्रकिनाऱ्यावर चारचाकी वाहनांना मोफत पार्किंग उपलब्ध असल्याने अनेक वाहने ठिकठिकाणी पार्क करण्यात आली आहेत.जंजिरा किल्याकडे मुरूड मासळी मार्केट वरून एकदरा पुलाकडे जाणारा मार्ग अरुंद असल्याने येथे वाहनांची सतत कोंडी होत होत आहे.यावर कोणताही प्रभावी उपाययोजना शासनाने केलेली अद्यापही दिसून येत नाही.

हजारोच्या संख्येने पर्यटक जंजिरा, पदमजलदुर्ग, समुद्रकिनारे पाहण्यासाठी रोहा,केळघर, साळाव , भालगाव मार्गे दाखल झाले आहेत.समुद्रकिनारी उपलब्ध क्रीडा, मनोरंजन सुविधांचा लाभ पर्यटक घेताना दिसून येत आहेत.मुरूड चे दत्त देवस्थान, नांदगाव येथील सिद्धी विनायक देवस्थान पाहण्यासाठी पर्यटकांनी भेट देऊन दर्शन घेतले.पर्यटन हंगाम सुरू झाल्याने स्टॉलधारक, लॉजिंग, हॉटेलिंग व्यवसाला तेजी येणार आहे.मुरूड शहरासाठी शासनाकडून आलेल्या निधीतून सौन्दर्यकरणाची विकास कामे सुरू असून लवकरच पर्यटकांना मुरुडचा नवीन लूक पाहायला मिळेल.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121