मुंबई : भाजप विरोधात मविआतील नेत्यांनी एकत्र येऊन वज्रमुठसभा घेतली. पण, त्यानंतरही आघाडीत मतभेद दिसुन येत आहेत. यावर भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत टोला लगावला आहे. "ही कसली वज्रमुठ, ही तर बनवाबनवीची झाकली मुठ." असे उपाध्ये म्हणाले.
EVM वरुन आघाडीत एकमत नसल्याचे केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विट मध्ये सांगितले. "छगन भुजबळ म्हणतात की EVM नको. अजित पवार सांगतात की, EVM मध्ये काहीच दोष नाही. तर, म्हणतात, जेपीसी हवी. शरद पवारांना जेपीसी नको. एका पक्षात एकमत नाही. अरे ना पक्षात एकमत ना महाविकास आघाडीमध्ये एकमत. ही कसली वज्रमुठ ही तर बनवाबनवीची झाकली मुठ. म्हणुन २०२४ मध्ये ही मोदीच येणार." असं उपाध्ये म्हणलेत.