युवराजांच्या आशीर्वादाने उभारलेले अस्लम शेख यांचे स्टुडिओ जमीनदोस्त!

    08-Apr-2023
Total Views | 38

(Action Against Unauthorized Studios)

युवराजांच्या आशीर्वादाने उभारलेले अस्लम शेख यांचे स्टुडिओ जमीनदोस्त!
मुंबई : मविआ काळातील तत्कालीन मंत्री असलेल्या किरीट सोमय्यांनी मढ परिसरात असलेल्या अनधिकृत स्टुडिओचा (Unauthorized Studios) मुद्दा उचलून धरला होता. एक हजार कोटींचे स्टुडिओ बेकायदेशीर असल्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादानं गुरुवारी दिला. आम्ही फक्त तात्पुरतं बांधकाम करण्यास परवानगी दिली होती. मात्र त्याजागी कायमस्वरुपी स्टुडिओ उभारण्यात आले, असं हरित लवादानं आपलया निर्णयात म्हटले आहे. प्रतीकात्मक कुदळ आणि फावडं घेऊन सोमय्या पाडकामाच्या ठिकाणी पोहोचले. आदित्य ठाकरे आणि मुंबई शहराचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादानंच हे स्टुडिओ उभे राहिले असा आरोप सोमय्यांनी केला आहे.
किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर आजपासून 1000 कोटींचे डजनभर अनधिकृत स्टुडिओ तोडण्याचे काम सुरु झाले आहे. ही कारवाई पाहण्यासाठी किरीट सोमय्या हातात हातोडा आणि फावडा घेऊन पोहचलेत. सोमय्या म्हणाले, "आदित्य ठाकरे आणि अस्मम शेख यांनी २०२१ मध्ये हे भ्रष्टाचाराचे स्मारक बांधले. टेम्पररी स्टुडिओ म्हणून शंभर फूट उंचीचे बांधकाम केले. या स्टुडिओवर कारवाई करायला दोन वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागला. उद्धव ठाकरे सरकारचे माफियागिरी आणि भ्रष्टाचारचे हे स्मारक आज उद्धवस्त करण्यास सुरुवात झाली आहे."
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121