मुंबई : संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदीबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यानंतर राऊतांच्या विधानाचा समाचार भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. संजय राऊतांना फार गांभीर्याने घेण्याचं काही कारण नाही. तुरुंगात जावं लागल्याने त्यांची पातळी घसरली आहे. हे सामान्य माणसाला आवडत आहे असं नाही. आजही सर्वांनी मोदींना जगातील सर्वात सर्वोच्च नेते म्हणून गौरवलं आहे. त्यामुळे मोदी यांनी जगाची अर्थव्यवस्था पुढं नेली आहे. मोदी यांच्या विषयी बोलून राऊत यांना समाधान मिळत असेल तर माहिती नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यापासून देश वेगाने प्रगती करत आहे. आपली गंगाजळी म्हणजे परकीय चलन सुधारलं. अनेक देशांनी रुपयात व्यवहार करण्यास मान्यता दिली. या सर्व गोष्टी सर्वसामान्य माणसाला कळतात. ते व्यवस्थित वर्तमानपत्र वाचतात.टिव्ही पाहतात. त्यामुळे राऊतांच्या विधानाला कोणीही गांभीर्यांने घेत नाही. अशी टीका ही पाटील यांनी राऊतांवर केली.