जागतिक वसुंधरा दिनी गुगलचे खास डूडल

पृथ्वी संवर्धनाचा दिला संदेश

    22-Apr-2023
Total Views | 58

Earth Day 2023

नवी दिल्ली
: पृथ्वीच्या संरक्षणासाठी, पृथ्वी आणि पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे, ही जाणीव व्हावी, म्हणून दरवर्षी २२ एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिवस उत्साहाने साजरा केला जातो.गुगलने यानिमित्त या संदर्भात खास गुगल डूडल बनवले असून पर्यावरण आणि पृथ्वीला वाचविण्याचा सल्ला दिला आहे. या गुगल डूडलमधून अनोख्या पद्धतीने वसुंधरेचे महत्त्व पटवून दिले आहे.

 
या खास गुगल डूडलमध्ये पर्यावरण वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न करावे, याचे चित्रण केले आहे. सुंदर असं गुगल डूडल दिसायलाही खूप छान दिसतंय.१९७० पासून वसुंधरा दिवस हा दरवर्षी २२ एप्रिलला साजरा केला जातो. पृथ्वीच्या संवर्धनासाठी हा दिवस साजरा केला जात असून त्यात १९२ देश सहभागी होत असतात.यंदाच्या जागतिक वसुंधरा दिनाचे ध्येयं ‘इनव्हेस्ट इन अवर प्लानेट म्हणजेच आपल्या पृथ्वीवर चांगल्या गोष्टींचे जतन करा ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होणार असा आशय यात आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121