महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! अजितदादांच्या संपर्कात ४० आमदार
18-Apr-2023
Total Views | 88
30
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे काही आमदारांसोबत राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन करेल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच आता अजित पवार यांच्यासोबत ५३ पैकी ४० आमदार असल्याचं समजते आहे.
योग्यवेळ आल्यावर ४० आमदारांच्या पाठिंब्याची यादी अजित पवार राज्यपालांना देणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीचे ४० आमदार घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार असल्याची ही चर्चा होऊ लागलेली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच आपल्याच बघायला मिळतं आहे. अजित पवार यांचा शासकीय बंगला देवगिरी बंद असल्याचे वृत्त समोर आले आहे.