बाबरी पडली तेव्हा बाळासाहेब काय म्हणाले होते?

    11-Apr-2023
Total Views | 95
bal-thackeray-on-babri-masjid

मुंबई
: बाळासाहेब ठाकरे त्या बाबरी वादग्रस्त ढाचा पाडल्यानंतर लखनऊला जाऊन सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजरझाले होते, त्यातील ते प्रमुख आरोपी होते.अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी स्वीकारणारे बाळासाहेब मुळात बाबरीच्या जमिनीवर राम मंदिर उभारण्याचे समर्थन करणारे नव्हते.२००४ मध्ये बीबीसी रेडिओच्या हिंदी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब म्हणाले होते की, वादग्रस्त जमिनीवर राम मंदिराऐवजी मंगल पांडे यांच्या नावाने राष्ट्रीय स्मारक बांधले पाहिजे जेणेकरून लोक तिथे येतील आणि त्यांनाही कळेल. इंग्रजांवर हल्ला करणारा तरूण कोण होता. त्यांचे हे धक्कादायक उत्तर दुसऱ्या दिवशी भारतातील जवळपास प्रत्येक वृत्तपत्राचे हेडलाइन बनले.त्याचे उत्तर सर्वांनाच धक्का देणारे होते.तसेच त्या जमिनीवर आमचा हक्क आहे, असे रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या ठरावावर बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते.

तुम्ही मुस्लीमविरोधी आहात असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, हे योग्य नाही. हा पूर्णपणे चुकीचा आरोप आहे. मी मुस्लिमांच्या विरोधात नाही. फाळणीच्या वेळी जे पाकिस्तानात गेले आणि जे इथे राहिले ते आपलेच आहेत.समस्या भारतीय मुस्लिमांची नसून बांगलादेशी घुसखोरांची आहे, असे रोखठोक उत्तर बाळासाहेबांनी दिले होते.बाबरी मशीदीच्या ढाच्याखाली मंदिर होते, असे स्पष्ट शब्दात बाळासाहेब ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. तसेच शिवसैनिक हे बाबरी मंदिराचा ढाचा पाडण्यासाठी गेले नव्हते? असा प्रश्न विचारल्यावर, ही तर मग खुप लाजिरवाणी गोष्ट आहे, असे विधान बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. तसेच त्यांनी मुस्लीम समाजाला ही बाबरी येथील हिंदू मंदिराचे संवर्धन करण्याच्या कामात मदत करायला सांगितले होते.

बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सबळ पुरावे नसल्याचे नमूद करत विशेष सीबीआय न्यायालयाने आरोपींना निर्दोष ठरवले. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी , मुरली मनोहर जोशी,उमा भारती ,यांचा समावेश होता. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असं निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवलं होते.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121