आंध्र प्रदेश: पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील दुवा गावात रामनवमी उत्सवादरम्यान वेणुगोपाल स्वामी मंदिराला आग लागली. कोणतीही जीवितहानी झाली नाही. रामनवमी उत्सवादरम्यान घडलेली ही दिवसभरातील दुसरी घटना आहे. देशभरातील विविध ठिकाणी वेगवळ्या दुर्घटना घडल्या आहेत. मध्य प्रदेशातील इंदूर येधील बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरातही रामनवमी दरम्यान एक दुर्घटना घडली. मंदिरातील इमारतीचे छत कोसळल्याने २५ पेक्षा अधिक लोक विहीरीत पडले. रामनवमीच्या वेळी मंदिरात मोठी गर्दी जमली असताना ही घटना घडली. या घटनेतही कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. यातील काही घटनांचे व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
रामनवमी हा एक हिंदू सण आहे.ज्या सणाला विष्णूचा सातवा अवतार रामाचा जन्मदिन साजरा होतो. यांच दिवशी अशी दुर्घटना घडणे हे फार वाईट आहे. तरी स्थानिक पोलीस आणि मंदिराच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले आणि आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.