रियल अकॅडमीची शहापूरमध्ये भव्य "विजय रॅली"

    17-Jun-2025   
Total Views |

कल्याण : रियल अकॅडमी या शहापूर तालुक्यातील नामांकित कोचिंग क्लासेस तर्फे रविवार दि. १५ जून रोजी भव्य विजय रॅलीचे आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चे १० वी, १२ वी, जेईई स्कॉलरशिप चे निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाले. सदर परीक्षेत रियल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून त्यांचा सन्मान करण्यासाठी रविवारी अकॅडमीतर्फे हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. शहापूर येथील अंबिका माता मंदिर ते व्ही. व्ही. भोपतराव सभागृहापर्यंत सर्व गुणवंत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विद्यार्थ्यांचे गुण दर्शवणारे विविध चित्ररथ, व चित्ररथावर स्वार झालेले सर्व टॉपर्स हा एक प्रेक्षणीय क्षण होता. सुमारे ३०० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक या रॅली मध्ये सहभागी झाले होते.

“सुंदर शहापूर-हरित शहापूर” असा संदेश देत रॅली मार्गातील दुकानदाराना रोपांचे वाटप केले गेले. रॅलीची सांगता आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा व्ही. व्ही. भोपतराव सभागृह येथे संपन्न झाला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शहापूर तालुक्यातील अनेक मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. शहापूर मधील एक बहुआयामी व्यक्तिमत्व, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर कुडव हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोबतच रामचंद्र काशीवले, दिलीप भोपतराव, संदीप पाटील, सुधाकर पाटील, डॉ. हरिश्चंद्र भोईर, सूर्याजी माने, रवींद्र भोईर, दत्तात्रय भरोदे, चंद्रकांत पाटील व तालुक्यातील इतर प्रतिष्ठित मान्यवर देखील उपस्थित होते. रियल अकॅडमीचे सर्वेसर्वा अमोल पोतदार यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सुमारे ३०० हुन अधिक विद्यार्थी आणि त्यांचे पालक, समाजातील नानाविध मान्यवर, रियल अकॅडमीची संपूर्ण टीम, रीऍल्युमनी फाउंडेशन (रियल अकॅडमी माजी विद्यार्थी संघ) चे पदाधिकारी आणि सर्व हितचिंतक रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम खूप उत्तम रित्या संपन्न झाला.