मनसे नेते अविनाश जाधव यांना मुंब्र्यात प्रवेशबंदी

ठाणे पोलिसांची कारवाई

    28-Mar-2023
Total Views | 88
 
Avinash jadhav

ठाणे : मनसेचे नेते अविनाश जाधव यांना ठाणे पोलिसांनी ९ एप्रिल पर्यंत मुंब्रा शहरात प्रवेश बंदी लागू केली आहे. अविनाश जाधव यांनी मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद, दर्गावर कारवाई करण्याची मागणी केली होती. अन्यथा, त्याचशेजारी श्री हनुमानाचे मंदीर उभारण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे, ऐन रमजान महिन्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहिम येथील अनधिकृत दर्गा विषयीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनीही मुंब्रा डोंगरावर वन विभागाच्या जागेत उभ्या असलेल्या अनधिकृत दर्गा, मशीद आणि मजार विषयी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. तसेच १५ दिवसांत कारवाई झाली नाहीतर त्याच्या शेजारीच हनुमानाचे मंदिर उभारण्यात येईल असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर साहाय्यक पोलीस आयुक्त विलास शिंदे यांनी अविनाश जाधव यांना नोटीस बजावली आहे. अविनाश जाधव यांना ९ एप्रिलपर्यंत मुंब्रा शहरात प्रवेश बंदी असेल असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. सध्या मुस्लिम धर्मियांचा रमजान हा पवित्र महिना सुरू आहे. अविनाश जाधव यांच्या वक्तव्यामुळे गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडू शकतो तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121