नवी दिल्ली : राहुल गांधींच्या राजकीय कारकिर्दीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. अशी घटना दि. २४ मार्च रोजी घडली. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर २४ मार्च रोजी लोकसभा अध्यक्षांनी लोकसभा सदस्यत्व रद्दची कारवाई केली. यामुळे राहुल गांधी ज्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते त्या मतदारसंघात पोटनिवडणूका होण्याची शक्यता व्यक्त केली जातं आहे.
राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यामुळे आता त्यांचा केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा रिक्त झाला आहे. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घोषित करणार की कसे, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण, पुढील वर्षी मे मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीस अद्याप जवळपास दीड वर्षांचा कालावधी बाकी आहे.