मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी

मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत दर्ग्याविरोधात आवाज उठवल्याने धर्मांध शक्ती फुरफुरल्या

    25-Mar-2023
Total Views | 152
Avinash Jadhav


ठाणे
: मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत दर्गे व मशिदी विरोधात आवाज उठवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांना धर्माध शक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धर्माधांच्या धमकीचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाण्यातील महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाले असुन याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज्यभरातील अनधिकृत मस्जीद,मजार आणि दर्ग्याची उभारणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सरकारने तत्परतेने माहिम व सांगलीतील मजारवर तातडीने कारवाई करून उध्वस्त केले होते. तर, दुसऱ्याच दिवशी मनसे नेते अविनाश जाधव यांनी,मुंब्रा येथील डोंगरात वनखात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरील अनधिकृत दर्ग्याचा प्रकार उघडकीस आणुन प्रशासनाला १५ दिवसात कारवाई करण्याचा अल्टीमेटम दिला होता. याचे पडसाद उमटताच जिल्हा प्रशासन व वनविभागाने मुंब्रा डोंगरावर पाहणी करून चौकशी सुरु केली असतानाच काही मुस्लीम धर्मांध याविरोधात एकवटण्यास सुरुवात झाली. त्यातील काहींनी अविनाश जाधव यांना, " हम उसे जिंदा नही छोडेंगे ... कोई गुस्ताख छुप न पाएगा ... हम उसे ढुंड ढुंड के मारेंगे ... " अशा आशयाचा व्हीडीओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. एस आर कमिटी ... बॉयकॉट अविनाश जाधव अशा आशयाच्या या व्हीडीओतील धमकी देणारी व्यक्ती दिसत नाही. अशी माहिती समोर आली आहे.दरम्यान, या धमकीनंतर महाराष्ट्र सैनिक संतप्त झाले असुन नौपाडा पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रीया सुरु आहे .
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121