मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बंड झाल्यानंतर त्यांची अवस्था ‘शोले’ या चित्रपटातील जेलरची भूमिका साकारणार्या असरानीसारखी झाल्याचा व्हिडिओ भाजपने सोशल मीडियावर ‘व्हायरल’ केला आहे. भाजपने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरही हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ काही तासांतच लाखांच्यावर जणांनी पाहिला असून, हजारोंनी तो पसंतही करून ‘फॉरवर्ड’ केला आहे.