शिवसेना संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांची गच्छंती होणार ?

- गजानन किर्तीकर यांच्या नियुक्तीचे पत्र सादर

    28-Feb-2023
Total Views | 140
 
Sanjay Raut
 
नवी दिल्ली : शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी संजय राऊत यांच्याऐवजी गजानन किर्तीकर यांची निवड व्हावी, असे पत्र संसदीय कार्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांनी दिली आहे.
 
शिवसेना मुख्यनेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड झाली आहे. त्यानंतर आता शिवसेनेच्या विविध पदांवरून ठाकरे गटाच्या खासदारांची गच्छंती करण्यास प्रारंभ झाला आहे. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यानी त्याविषयीची माहिती दिली. ते म्हणाले, शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदेहे आहेत. त्यामुळे आता शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी शिवसेनेच्याच खासदारांची नियुक्ती होणे आवश्यक आहे. त्यामुळे या पदावर आता राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्याऐवजी गजानन किर्तीकर यांची नियुक्ती व्हावी, असे पत्र केंद्रीय संसदीय कार्यमंत्र्यांना शिवसेनेतर्फे देण्यात आली आहे.
 
शिवसेना पक्षाचा व्हिप मान्य करणे राऊत यांनाही बंधनकारक असल्याचे शेवाळे यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, अर्थात, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लगेचच व्हिप बजाविण्याविषयी कोणताही निर्णय झाला नसल्याचेही शेवाळे यांनी स्पष्ट केले आहे.
 
शिवसेना कार्यालयातही बदल
 
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर संसदेतील कार्यालयाचा ताबा शिवसेनेकडे देण्यात आला आहे. त्यानंतर आता कार्यालयामध्ये बदलांना प्रारंभ झाला आहे. शिवसेनेच्या संसदेतील कार्यालयामध्ये यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे लावण्यात आली होती. त्यानंतर आता ती छायाचित्रे काढण्यात आली असून त्याजागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121