राहुल गांधी काय बोलतात त्यांचं त्यांना कळत नाही!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला समाचार

    27-Feb-2023
Total Views | 83
bawankule-rahul-gandhi-does-not-know-what-he-is-talking-about-what-will-i-say


मुंबई
: स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथीलाही राहुल गांधींनी गरळ ओकली. याविरोधात भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी त्यांचा समाचार घेतला आहे. "राहुल गांधी काय बोलतात, ते त्यांचं त्यांनाच कळत नाही. त्यांच्या भाषणातले मुद्दे काय असतात, तेही कळत नाही. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे, हे मलाही कळत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार," असा प्रतिप्रश्‍न बावनकुळे यांनी केला. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

"सावरकरांचा इतिहास वाचला असेल, तर चार ओळी वाचल्यावर आपल्या डोळ्यात अश्रू येतात आणि त्यांच्या नावावरून घाणेरडे राजकारण केले जात आहे. राजकारणासाठी लोकांचा स्तर एवढा खाली गेला आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेवर आणि इतिहासावर वक्तव्य करायला लागले आहेत. यांनी खालची पातळी गाठली आहे. यापेक्षा खालची पातळी राजकारणात असू शकत नाही." असेही ते म्हणाले.
 
"दिल्लीचे आपचे मंत्री मनीष सिसोदियांच्या चौकशीच्या प्रश्नावर बावनकुळे यांनी थेट उत्तर दिले. ते म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांना वाटलं तर ते कुणाचीही चौकशी करू शकतात. चौकशीत त्यांना काही पुरावे मिळाले असतील म्हणून कारवाई झाली असेल, विरोधी पक्षाचे कामच आहे एजन्सीला विरोध करायचा. आतापर्यंत त्यांनी तेच केले आहे. कुठल्याही तपास यंत्रणा नियमांच्या बाहेर किंवा पुराव्याच्या बाहेर जात नाही. त्यामुळे ज्याची कुणाची चौकशी सुरू झाली, त्यांनी फालतू विरोध करू नये, तर चौकशीला सामोरे जावे आणि तपास यंत्रणेला सहकार्य करावे, आमच्या पक्षातही कितीतरी चौकश्‍या झाल्या. माझीसुद्धा चौकशी झाली आहे. पण आम्ही असं नाही केलं. निमूटपणे चौकशीला सामोरे गेलो आणि तपास यंत्रणेला सहकार्य केले, असे बावनकुळे म्हणाले.

सरकार आल्यानंतर किंवा सरकार नसताना दोन्ही वेळी जर आंदोलन करून न्याय मिळत नसेल. त्यामुळे आंदोलनात आमचे प्रतिनिधी गेले तर काही फरक पडत नाही. गोपीचंद पडळकर यांनी एसटीच्या आंदोलनात जावे, यात काही नवीन नाही. सरकारचे लक्ष वेधणे हे आमदाराचं कामच आहे, असेही ते म्हणाले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121