जग कुठे चाललंयं? आपण 'लव्ह जिहाद'मध्ये अडकून पडलोयं!
राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळेंचा भर सभेत सवाल
14-Feb-2023
Total Views |
100
मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित एका कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळेंचा म्हणाल्या की, एकविसाव्या शतकात ५जी फोन आलेत. आपल्याला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून बसून कळेल की अमेरिकेचा राष्ट्रअध्यक्ष काय करतोय. तसेच 'लव्ह' चा अर्थ मला माहिती आहे. पंरतू ' लव्ह जिहाद'चा अर्थ मला माहित नाही. तसेच नव्याने 'लँण्ड जिहाद' नाव माझ्यासमोर आले आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत हे मला माहित नाहीत, असे विधान सुप्रिया सुळेंनी भर सभेत केले आहे.
एकीकडे 'लव्ह जिहाद' आणि 'लँण्ड जिहाद' चा मुद्दा देशभर चर्चिला जात असताना लव्ह जिहाद म्हणजे काय? मला माहितच नाही असे म्हणणे हे कितपत योग्य आहे. तसेच लव्ह जिहाद हा शब्द कुठल्याही dictionary मध्ये किंवा माझ्या शिक्षणामध्ये आला नाही, असे वादग्रस्त विधान खासदार सुप्रिया सुळेंनी केले आहे.