इस्रायलच्या राजदूतांना 'वंदे भारत' ची भूरळ!

    10-Feb-2023
Total Views | 135
Kobbi Shoshani

नवी दिल्ली
: इस्रायलचे राजदूत कोबी शोशानी यांनी दि. १० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केलेल्या मुंबई ते सोलापूर या वंदे भारत एकस्प्रेसमध्ये प्रवास केला. त्यावेळी ते म्हणाले की, भारतीय रेल्वेमध्ये झालेल्या सुधारण पाहून 'वंदे भारत' एकस्प्रेसने प्रवास करण्यासाठी मी उत्सुक आहे. तसेच स्वदेशी पद्धतीने 'सेमी हायस्पीड' ट्रेन विकसित कऱणे हे भारतासाठी अभिमानास्पद आहे, असे कोबी शोशानी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. १० फेब्रुवारी रोजी मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन 'वंदे भारत' एक्सप्रेसचे उद्घाटन झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र आणि संपुर्ण देशभरातील महत्तवाचे असे हे रेल्वे क्षेत्र बऱ्याच वर्षापासून दुर्लक्षित होते. परंतू पंतप्रधानांच्या नेतृत्वात आज रेल्वे क्षेत्राच्या विकासाचा आलेख उंच्चावत आहे.तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वंदे भारत' एक्सप्रेसच्या उद्घाटन प्रंसगी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'वंदे भारत' एक्स्प्रेस भारतात सुरू होईल,असे कोणालाच वाटले नव्हते. परंतू पंतप्रधानाच्या नेतृत्वात आज महाराष्ट्रात वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होत आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल, असे फडणवीस म्हणाले.

"वंदे भारत एक्सप्रेस देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या विकासाचं एक प्रतिक असून राज्यात सुरु झालेल्या दोन वंदे भारत ट्रेनमुळे राज्यातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्राला चालना नक्कीच मिळेल. त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे.", असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121