मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन 'वंदे भारत' एक्सप्रेसला दि. १० फेब्रुवारी रोजी हिरवा कंदील दाखवला जाणार आहे.त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वंदे भारत' एक्सप्रेसच्या उद्घाटन प्रंसगी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'वंदे भारत' एक्स्प्रेस भारतात सुरू होईल,असे कोणालाच वाटले नव्हते. परंतू पंतप्रधानाच्या नेतृत्वात आज महाराष्ट्रात वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होत आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल, असे फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'वंदे भारत' एक्स्प्रेसची सुरूवात होणे ही महाराष्ट्रसाठी आनंदाची गोष्ट आहे. साईबाबाच्या आशीर्वादासाठी मुंबई ते शिर्डी आणि तुळजाभवानी,पंढरीच्या पांडुरंगाच्या आशीर्वादासाठी मुंबई ते सोलापूरपर्यत 'वंदे भारत' एकस्प्रेस सुरू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार देंवेद्र फडणवीस यांनी मानले.
तसेच महाराष्ट्रातील रेल्वेच्या विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १३ हजार कोटी रूपये पंतप्रधानानी मंजूर केल्याबद्दल ही फडणवीसांनी मोदींचे आभार मानले. महाराष्ट्रातील १२४ रेल्वे स्थानकांचा विकास लवकरच पंतप्रधानाच्या नेतृत्वात होईल. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानक हे भविष्यात 'आयकॉनिक रेल्वेस्थानक' म्हणून ओळखले जाईल, असा आशावाद फडणवीसांनी व्यक्त केला.भारतातीय रेल्वेचे निर्माते नाना शंकरशेठ यांना ही फडणवीसांनी भाषणातून अभिवादन केले. तसेच भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव सुवर्णाक्षरात लिहले जाईल, असेही फडणवीस म्हणाले.