पुणे : देशातील मुलींची पहिली शाळा बांधण्यात आली होती त्या ऐतिहासिक भिडेवाड्याचे जीर्ण बांधकाम मंगळवारी पहाटे पाडले. महत्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. येथे राष्ट्रीय स्मारक बांधण्यासाठी या जागेच्या वादावर न्यायालयात महापालिकेच्या बाजूने निकाल लागल्याने अखेर ही जागा प्रशासनाच्या वतीने ताब्यात घेण्यात आली होती.
दरम्यान, आता तेथील जीर्ण झालेले बांधकाम पाडण्यात आले आहे. भिडेवाडा हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने रात्री वाडा पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रात्री पोलीस बंदोबस्तात वाडा पाडल्याने अखेर भिडेवाडा इतिहासजमा झाला आहे.