मुंबई : नववर्ष सुरु होण्यासाठी अवघा एक दिवस उरला असताना शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी वाहूतक पोलीसांकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, ३१ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ८ ते १ जानेवारी २०२४ सकाळी ८ या कालावधीत सांताक्रुझ वाहतुक विभागात जुहू चौपाटी येथे खूप मोठया संख्येने जनसमुदाय येण्याची शक्यता आहे.
त्यावेळी जुहू चौपाटीकडे येणारे रस्ते व्ही. एम. रोड, जुहू रोड, जुहू तारा रोड, व जुहू चर्च रोड येथे पादचाऱ्यांची व वाहनांची मोठया प्रमाणामध्ये वर्दळीमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. सदर रोडवर वाहतूक कोंडी झाल्यास नागरीकांची गैरसोय व विलंब टाळण्यासाठी दिनांक ३१/१२/२०२३ रोजीचे १४:०० वाजल्यापासून दिनांक ०१/०१/२०२४ रोजीचे सकाळी ०८:०० वाजेपर्यंत आत्यावश्यक सेवा वाहनाव्यतिरीक्त इतर वाहनांना वाहतुकीसाठी मज्जाव करण्यात येत आहे, असे वाहतूक पोलीसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या ठिकाणी असेल वाहने उभी करण्यास मनाई
जुहू रोडच्या महाराणा प्रताप जंक्शन ते जुहू कोळीवाडा जंक्शन पर्यत दोन्ही वाहिन्यावर (दक्षिण / उत्तर) नमुद कालावधीत वाहने पार्क करण्यास मनाई राहील.
जुहू तारा रोडच्या जुहू कोळीवाडा जंक्शन ते बी पी पटेल जंक्शन पर्यत दोन्ही वाहिन्यावर (दक्षिण/ उत्तर) नमुद कालावधीत वाहने पार्क करण्यास मनाई राहील.
व्ही एम रोडच्या बी पी पटेल रोड ते व्ही एम रोड आणि एस व्ही रोड जंक्शन पर्यंत दोन्ही वाहिन्यावर (दक्षिण / उत्तर) नमुद कालावधीत वाहने पार्क करण्यास मनाई राहील.
व्यलिप स्टार जंक्शन ते बलराज सहानी रोड पर्यंत दोन्ही वाहिन्यावर (दक्षिण/ उत्तर) नमुद कालावधीत वाहने पार्क करण्यास मनाई राहील.