"सी व्होटर सर्व्हे असो किंवा झेड व्होटर, हवा फक्त मोदीजींचीच!"

उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

    25-Dec-2023
Total Views | 97

Devendra Fadanvis


पुणे :
सी व्होटर सर्व्हे असो किंवा झेड व्होटर असो, फक्त मोदीजींचीच हवा आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पुणे येथे सोमवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबद्दलदेखील चर्चा केली.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी प्रत्येक सर्व्हेचा सन्मान करतो पण, ए व्होटर, बी व्होटर, सी व्होटर, डी व्होटर, इ व्होटर असो किंवा झेड व्होटर, फक्त मोदीजींचीच हवा आहे. जनतेने मोदीजींनाच मत द्यायचं हे ठरवून टाकलं आहे. त्यामुळे लोकसभेत आम्ही ४० च्या पार जाणार म्हणजे जाणारच," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
 
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत बोलताना ते म्हणाले की, "घाबरण्याची स्थिती नाहीये मात्र, काळजी घेण्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे या संपुर्ण परिस्थितीकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. मुख्यमंत्र्यांनी स्वत: बैठक घेऊन काय काळजी घेतली पाहिजे याबद्दलचे आदेश दिले आहेत. कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत. पण इथे फार प्रादुर्भाव वाढणार नाही अशी अपेक्षा आपण करुया. आपला पुर्वानुभव लक्षात घेता सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121