शिंदेंच्या बनावट मेल आयडीवर पाठवला व्हीप! सुनावणीत खडाजंगी!

    02-Dec-2023
Total Views | 79


sunil mahesh
 
मुंबई: आमदार अपात्रता संदर्भातील सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे. सहाव्या दिवसाच्या सुनावणीत मुख्यमंत्री शिंदे यांना ठाकरे गटाकडून २२ जून २०२२ रोजी बनावट ईमेल आयडीवर व्हीप (पक्षादेश) पाठवला गेला, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आलाय. तसा अर्जही त्यांनी विधानसभा अध्यक्षांना सादर केला होता. या मुद्द्यावर दोनही गटांच्या वकीलांमध्ये जोरदार खडाजंगी पहायला मिळाली आहे.
 
शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभूंनी एकनाथ शिंदे यांना व्हीपसाठी जो ई मेल पाठवला तो ईमेल आयडी महाराष्ट्र विधानसभा डायरीतून घेतल्याचे सांगितले. परंतु महेश जेठमलानी यांनी तुम्ही व्हीप चा मेल एकनाथ शिंदेंना पाठवलाच नाही आणि आता बनावट मेल आयडी सादर करत आहात असा आरोप केलाय. यावर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत चांगलेच संतप्त झालेले पाहायला मिळाले.
 
 
दरम्यान "विरोधात खटला उभा असताना शपथेखाली खोटे बोलणे आणि खोटी व बनावट कागदपत्रे सादर केल्याबद्दल प्रभूंचे सत्य उलटतपासणी दरम्यान लोकांच्या समोर आले आहे. प्रभू त्यांची लबाडी आणि फसवणूक लपविण्यासाठी असे डावपेच अवलंबत आहेत" अशी टीका उदयोगमंत्री उदय सामंत यांनी केली होती.
 
ठाकरे गटाचे सचिव खासदार अनिल देसाई सुद्धा पहिल्यांदाच सुनावणीला उपस्थित होते. दुपारी २.३० पर्यंत प्रभू यांची सुनावणी घेण्यात आली. दुपारी ३.३० वाजता जेवणाच्या सुट्टीनंतर पुढील सुनावणीला सुरुवात होणार आहे. आजच दुपारी ३.३० नंतर शिवसेना कार्यालय सचिव विजय जोशी यांची सुनावणी घेतली जाणार आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
अटल सेतु सह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

अटल सेतु सह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याची धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने घेतले होते. त्यानुसार २१ ऑगस्टपासून अटल सेतू सह मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग तसेच समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी करण्यात येत असल्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121