'वंदे साधारण' ट्रेन वेधत आहे प्रवाशांचे लक्ष! चाचणीनंतर लवकरच सेवा देण्यासाठी सज्ज

    08-Nov-2023
Total Views | 34

Vande Sadharan


मुंबई :
भारतीय रेल्वेमध्ये सामील होणारी 'वंदे साधारण' ट्रेनची सध्या चाचणी सुरु आहे. चेन्नईच्या कारखान्यातून मुंबई आणि मुंबईहून सोलापूर मार्गे गुजरातमधील वडोदरा असा प्रवास या ट्रेनने पुर्ण केला आहे. दरम्यान, चाचणी पुर्ण करुन लवकरच ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत हजर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
वंदे साधारण ट्रेन ही इतर ट्रेनपेक्षा वेगळी आहे. यामध्ये एकूण २२ डबे राहणार असून यातील १२ डबे असतील. या ट्रेनचा वेग ताशी १३० किमी एवढा असेल. ही नॉन-एसी ट्रेन असून तिचे भाडे वंदे भारत ट्रेनपेक्षा कमी असेल. भगव्या आणि राखाडी रंगात असलेली ही ट्रेन प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे.
 
दरम्यान, सध्या वंदे साधारण ट्रेनची ट्रायल रन घेतली जात असून, यादरम्यान त्यातील त्रुटी तपासल्या जातील. यामध्ये सर्व काही व्यवस्थित असल्यास या वर्षाच्या शेवटपर्यंत ही ट्रेन सर्वसामान्यांसाठी सेवेसाठी आणली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121