मतदान सुरु असतानाच छत्तीसगडमध्ये बॉम्बस्फोट! सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी

    07-Nov-2023
Total Views | 48

Chhattisgarh


रायपूर :
छत्तीसगडमध्ये मंगळवारी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु झाले आहे. मात्र, इथे मतदानाची सुरुवातच बॉम्बस्फोटाने
झाली आहे. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी ३ आयईडी स्फोट केले आहेत. यामध्ये सुरक्षा दलाचे तीन जवान आणि २ मतदान कर्मचारी जखमी झाले आहेत.
 
छत्तीसगडमधील सुकमा गावातील टोंडामरका भागात ७ नोव्हेंबर रोजी नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट केला आहे. हा स्फोट आयईडीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा बटालियनचा एक जवान जखमी झाला आहे.
 
मतदानाच्या एक दिवस आधी येथील कांकेर आणि नारायणपूर या दहशतवादग्रस्त जिल्ह्यांमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला होता. त्यानंतर आता मतदान सुरु होऊन २४ तास उलटायच्या आतच पुन्हा एकदा बॉम्बस्फोट घडवण्यात आला आहे.
 
दरम्यान, पहिल्या टप्प्यात छत्तीसगडमधील दुर्ग आणि बस्तर भागातील २०विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. नक्षलवादी कायम त्यांच्या प्रभाव असलेल्या भागांमध्ये लोकांना मतदान न करण्याची धमकी देतात. त्यातच आता यावेळीही ते मतदान थांबवण्यासाठी बॉम्बस्फोट करत आहेत.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121