"कट्टरपंथी जगात कुठेच शांततेत राहू शकत नाहीत"- हमास नेत्याच्या मुलानेच सांगितले वास्तव
01-Nov-2023
Total Views | 391
1
नवी दिल्ली : "हिंदूंना कोणतीही अडचण नाही, ख्रिश्चन आणि ज्यू देखील एकत्र आहेत. मग हिंसाचार फक्त कट्टरवाद्यांकडूनच का होतो? मला बाकीच्या जगाशी काही अडचण नाही. भारतीयांना कोणतीही अडचण नाही. ख्रिश्चन, ज्यू, आपण सर्व एकत्र आहोत. हमास आणि इतर कोणत्याही कट्टरवादी चळवळीचा नायनाट करण्याची गरज आहे. आपल्याला ते अगदी स्पष्टपणे आणि मोठ्याने सांगायचे आहे. धार्मिक दहशतवाद स्वीकारला जाणार नाही," असे विधान मोसाब हसन युसुफ यांनी केले आहे.
मोसाब हसन युसुफ हे हमासच्या एका वरिष्ठ नेत्याचे पुत्र आहेत. पण त्यांनी हमासच्या कट्टरवादाला कंटाळून त्यांनी इस्लाम धर्म सोडण्याचा निर्णय घेतला. मोसाब हसन युसुफ यांनी भारतीयांचे कौतुक केले आणि हमास दहशतवाद्यांविरोधात आवाज उठवल्याबद्दल हिंदू समुदायाचे कौतुक केले. टाइम्स नाऊला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत, 'सन ऑफ हमास' नावाचे पुस्तक लिहिण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या युसुफ यांनी सांगितले की कट्टरवादी एकत्र राहू शकत नाहीत आणि त्यांना एकत्र राहायचे नाही.
त्यांनी सांगितले की, "मला कट्टरवादी विचारसरणी नाकारण्यासाठी आणि हिंसाचाराला नाही म्हणण्यासाठी जवळजवळ मरण पत्करावे लागले. “माझ्या संपूर्ण देशाने मला दूर ठेवले. मला सैतान म्हणून ओळखले गेले. याचे कारण असे की मी हिंसाचार, रक्तपात आणि आत्मघाती बॉम्ब हल्ल्यांना नाही म्हटले. ज्यांचा मार्ग वेगळा आहे त्यांच्याशी ते हेच करतात. मला दोन्ही बाजू माहित आहेत आणि या अधिकारावर, मी म्हणतो की आपण इस्रायलच्या मागे एकजुटीने उभे राहिले पाहिजे." असे ते म्हणाले.