ओळख लपवून मैत्री, प्रेम आणि लग्न! नंतर धर्मांतरासाठी दबाव; लव्ह जिहाद प्रकरणी ९ वर्षानंतर न्याय

    07-Oct-2023
Total Views | 115

Love Jihad


रांची :
शूटर तारा शाहदेव लव्ह जिहाद प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तीन आरोपींना शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील दोषी रकीबुल हसन उर्फ ​​रणजीत कोहलीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच रकीबुलची आई कैशर राणी हिला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून कट रचल्याचा आरोप असलेला मुश्ताक अहमद याला १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 
त्याचबरोबर सर्व दोषींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. हे प्रकरण झारखंडची राजधानी रांचीमधील आहे. रकीबुल हसनने आपली ओळख लपवून लग्न केले असून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आपला तिचा छळ करत असल्याचा आरोप तारा शाहदेवकडून करण्यात आला होता.
 
तारा शाहदेव ही राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज असून ती होटवारमध्ये तिचा सराव करण्यासाठी गेली होती. यादरम्यान तिची रकीबुल हसन उर्फ ​​रणजित सिंग कोहलीशी मैत्री झाली. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांचे लग्न झाले. मात्र, तोपर्यंत त्याने आपली मुस्लिम ओळख लपवून ठेवली होती.
 
लग्नानंतर तारा शाहदेव हिला आपल्या पतीचे खरे नाव रकीबुल हसन असल्याचे समजले. त्यानंतर रकीबुल हसन आणि त्याच्या आईने तिच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. परंतू, ताराने धर्मांतर करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी तिचा छळ करण्यास सुरूवात केली. मात्र, तारा कशीतरी त्यांच्या तावडीतून सुटली.
 
त्यानंतर ताराने पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार केली. याप्रकरणी झारखंड पोलिस तपास करत होते. पुढे २०१५ साली झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. २०१७ मध्ये याप्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाने ३० सप्टेंबर रोजी या प्रकरणात तिन्ही आरोपींना दोषी ठरवले होते. आता या तिघांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121