छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा जम्मू काश्मीरला रवाना

    24-Oct-2023
Total Views | 90

shivaji maharaj

मुंबई :
भारत पाक सीमेवर मराठ्यांच्या पराक्रमाची माहिती देण्यासाठी जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथे छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून २४ ऑक्टोबर रोजी मुंबईतील राजभवन येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांचा हस्ते हा पुतळा रवाना करण्यात आला.
 
'आम्ही पुणेकर फाऊंडेशन' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती' यांच्या पुढाकाराने हा पुतळा साकारण्यात आला आहे. तसेच यावर्षी ४ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर भारतीय नौदल दिनाचा सोहळा होणार असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचे बैस म्हणाले. राज्यपालांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन तसेच रथपूजन यावेळी करण्यात आले.

यावेळी बोलताना राज्यपाल रमेश बैस म्हणाले, नव्याने बांधण्यात आलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक पाहण्यासाठी देशभरातून लाखो लोक येतात. मात्र देशातील फार कमी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकिल्ले पाहिले आहेत. हे चित्र बदलून शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी शिवकालीन गडकिल्ल्यांचे फोर्ट सर्किट तयार करावे तसेच पर्यटकांना सर्व किल्ल्यांची माहिती देणारे पुस्तक तयार करावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांमधून तरुणांना प्रेरणा तर मिळेलच, शिवाय गडकिल्ल्यांचा विकास झाल्यास त्यातून रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.
 
देशाच्या सीमेवर अनेक मराठी जवान देशरक्षणाचे काम करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे सीमेवरील जवानांना हजार हत्तींचे बळ लाभेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. कुपवाडा येथील महाराजांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू दिल्या जाणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121