फार्महाऊसवर होता अंमली पदार्थाचा अड्डा! पोलिसांनी केला पर्दाफाश
23-Oct-2023
Total Views | 23
मुंबई : ललित पाटील प्रकरणानंतर आता आणखी एका अमली पदार्थ निर्मिती युनिटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील एका व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे. सोमवारी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील एका फार्महाऊसवर अंमली पदार्थ निर्मिती युनिट कार्यरत होते. या युनिटचा मीरा-भाईंदर विरार-वसई (MBVV) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मीरा-भाईंदर विरार-वसई (MBVV) पोलिसांनी रविवारी एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे.
या कारवाई अंतर्गत पोलिसांनी आदिवासी बहुल मोखाडा तालुक्यातील कावलपाडा भागातील फार्महाऊसवर छापा टाकला असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले आहे. दरम्यान, या कारवाईत पोलिसांनी अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच अंमली पदार्थांचे उत्पादन आणि वितरण केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.