Palghar

दक्षिण भारतातील रामकथांची साहित्यसृष्टी तामिळ भाषेतील ‘कम्ब रामायण’

Kamba Ramayana दक्षिण भारतातील तामिळ ही जगातील संस्कृत एवढीच, प्राचीन अभिजात भाषा आहे. या भाषेत अनेक रामकथा लिहिल्या गेल्या आहेत. त्यामध्ये इसवी सनाच्या नवव्या शतकात चोल राज घराण्याच्या राजवटीत, कम्बन् हा थोर महाकवी, चिंतक, तत्त्वज्ञ होऊन गेला. या महाकवीचे रामायण ‘कम्ब रामायण’ तथा ‘रामावतारम्’ म्हणून विश्वविख्यात आहे. जागतिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृती महाकाव्य म्हणून, कम्ब रामायणाचा गौरव केला जातो. ‘कविचक्रवर्ती’ अशा अनेक पदव्याप्राप्त कम्बन् हा राजकवी होता. तामिळ भाषा गौरव, कीर्तिस्तंभ म्हणून, दोन

Read More

डॉ. आनंद साधले यांचे ‘महाराष्ट्र रामायण’

महाराष्ट्राची भूमी आणि संस्कृतीच्या प्रेमातून-स्वाभिमानातून प्रसवलेले श्लोकबद्ध महाकाव्य म्हणजे डॉ. आनंद साधले यांचे ‘महाराष्ट्र रामायण’ होय. रामाला पिता, सीतेला माता आणि हनुमानाला महाराष्ट्राचा निर्माता मानणार्‍या डॉ. साधलेंचे हे रामायण भक्ती-प्रासादिकतेऐवजी शृंगार, करुण आणि वीर रसाला प्राधान्य देणारे आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची विवेचक प्रस्तावना या काव्यास लाभली असून शृंगाराच्या अतिरेकाचा त्यांनी स्पष्टपणे निर्देश केलेला आहे. आधुनिक पाश्चात्य ऐहिक दृष्टिकोनातून लिहिलेले हे रामायण काव्य-कल्पन

Read More

महाराष्ट्रातील संतांचे अयोध्येशी आणि प्रभू श्रीरामांशी ऋणानुबंध!

अयोध्या, रामायण, रामभक्ती आणि महाराष्ट्र यांचा संबध कैक शतकांचा आहे. किमान १५०० वर्ष महाराष्ट्रात रामकथा सांगितली जात आहे. मध्यंतरीच्या काळातील साहित्याचे धागेदोरे फारसे उपलब्ध नसले तरी संत नामदेवांपासून रामभक्तीच्या रचना मराठी भाषेत आढळतात. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या सर्वांना आकार देणाऱ्या मराठी संतानी अयोध्येचा महिमा वेळोवेळी वर्णन केला आहे. इ.स.च्या तेराव्या शतकाच्या अखेरीस तीर्थयात्रेच्या निमित्ताने भारतभ्रमण करणारे संत ज्ञानेश्वर (इ.स. १२७५ ते १२९६) व संत नामदेव (इ.स.१२७० ते १३५०) हे मराठीतले

Read More

भारतात इंटेलेक्चुअल क्षत्रियांची आवश्यकता : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

पुणे : “प्रतिकार-प्रबोधन-आचरण आणि संशोधन ही धर्म रक्षणाची चतु:सूत्री आहे. धर्म जाणून घेत कालसुसंगतरीतीने लोकांसमोर मांडणे आवश्यक आहे. शाश्वत धर्माचे काल सुसंगत आचरण लोकांना सांगावे लागते आणि आचरणामधून ते शिकवावेदेखील लागते. कालौघात विस्मरणात गेलेले ज्ञान आणि धर्म पुन्हा संशोधित करून लोकांसमोर मांडावा लागतो. समाजात एकसूत्रता आणण्यासाठी समर्थ रामदासांनी कालानुरूप रचना केली. समाज जागृतीमधूनच विध्वंसकारी शक्तीला प्रतिकार सुरू झाला. प्रभू रामचंद्रानंतर समर्थांनी शिवाजी महाराजांचा समाजासमोर आदर्श ठेवला. छत्रपती श

Read More

समर्थ रामदास लिखित वाल्मिकी रामायणाचे राष्ट्रार्पण

धुळे येथील श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर यांच्यातर्फे श्री समर्थ रामदास स्वामी लिखित वाल्मिकी रामायणाच्या संपादित आवृत्तीच्या आठ खंडांचा प्रकाशन सोहळा आज, बुधवार, दि. ५ जुलै रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता संपन्न होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते या ग्रंथांचे राष्ट्रार्पण होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फुलगाव येथील श्रृतिसागर आश्रमाचे स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांतस

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121