मोहित सोमण
स्वत्व प्रगती करणे शक्य लगेच होऊ शकते. पण दुसऱ्याला घडवणे हे निरंतर यशाचे मानक ठरते. नेतृत्व करणे ही वरकरणी सोपी गोष्ट वाटली असली तरी ती तितकीशी सोपी नाही. व्यवसायाचे नेतृत्व असल्यास तर कर्मकठीण काम. पण निश्चितच ते अशक्य नाही. आपल्या आदेशांवर कर्मचाऱ्यांना नाचवणे म्हणजे ' लीडरशीप स्किल ठरत नाही. किंबहुना प्रोत्साहित करून नवीन नेतृत्व घडवणे याला नेतृत्व म्हणतात. विविध परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्याची क्षमता असलेला व्यक्ती नेहमीच यशस्वी ठरतो. कालाचे योग्य आकलन हा वस्तुनिष्ठ प्रश्न असला तरी तो शेवटी मानवीच आहे. माणसाच्या विचारांअंती तयार होणारे कोलाज आहे. क्षणाचे दडपण घेत तडकाफडकी निर्णय घेताना कुठलीतरी चूक होण्याची दाट शक्यता असते किंबहुना होतेच.परंतु डोक्यावर बर्फ ठेवून विचार केल्यास निश्चितच फायदा होतोच.उदाहरणार्थ क्रिकेट मध्ये महेंद्रसिगं धोनीच्या नेतृत्वाचे सगळीकडे खूप कौतुक झाले.विचारांअंती न डगमगता शांतपणे निर्णय घेण्याच्या गुणांनी धोनी कायमच यशस्वी ठरला.चेहऱ्यावर देखील कधीही चिंतेचे भाव त्याने दाखवले नाही. याच प्रकारची प्रामाणिक देहबोली निर्माण करण्यासाठी वर्षांचा कालावधी लागतो.
काळजाचा ठोका चुकताना मात्र सत्याची जाणीव होते.परंतु याचा आधी विचार केल्यास आधीच तयारी करता येते. नेतृत्व कौशल्याचे देखील तसेच आहे. व्यवसायाचात कोणाला कसे हाताळावे, कुठला निर्णय घ्यावा, व्यवसायाचे उदिष्ट कसे असावे, स्पष्टीकरण देताना स्वतः चे ठोकताळे कसे निवडावे, जमीनीवरील निर्णय कसा घ्यावा हा सगळा नेतृत्व घटनेचा भाग झाला तरी प्रत्यक्षात त्यांचे पालन फार कमी पुढारी करतात.व्यवसायाची अखेर अनुभुती यश, प्रतिष्ठा, नफा आहे. पण हे अखेर नेतृत्व कौशल्याचे फळ आहे. अनेक गोष्टींचा एकत्रित प्रयत्न म्हणजे व्यवसायाचे यश व त्यासाठी लागते नेतृत्व.
उत्तम नेतृत्व जो करू शकतो तो उत्तम अंदाज भापणारा आहे. ' इमोशनल इंटेलिजन्स ' या प्रकारचे प्राबल्य असल्यास नेतृत्वाला चार चांद लागतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात विविध घटना घडतात त्याचे आकलन करत आपल्या निष्कर्षावर माणूस निर्णय घेतो.समोरील माणूस काय निर्णय घेतो, काय अपेक्षा करतो व काय त्याच्याकडून अभिप्रेत आहे हे सगळे उत्कृष्टपणे संवादाने सांगणारा लीडर हा कायम व्यवसाय लीड करतो.
अलीकडे विशेष प्राविण्य जोपासण्यासाठी खास ' नेतृत्व' कौशल्याचे पदविका व पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. ' Conflict of Interest ' या प्रकारात हे कौशल्य मोठा बदल घडवून आणण्यास मदत करते.आपला ' Emotional Quotient ' काय आहे त्यावर पुढचा घटनाक्रम काय घडवू शकतो किंवा घडवून आणू शकत यांचे आकलन करणे सोपे जाते.
व्यवसायात उत्पादनापासून, व्यवसायिक वृद्धी, भांडवल नियोजन, मानवी संसाधन, दैनंदिन कामकाज, उद्दिष्टांना अपेक्षित असलेली भावी तरतूद, भविष्य या सगळ्यांचे एकत्रित उपक्रम राबविल्यास त्याच्या निकाल सकारात्मक ठरू शकतो. अनेक ठिकाणी देखील योग्य संयम दाखवल्यास पुढील मोठ्या लढाया नेतृत्वाला लढता येतात.
मनुष्य स्वभाव पाहता एका विशिष्ट उंचीवर गेल्यावर अहंकार येणे स्वाभाविक आहे पण त्याचा अतिरेक झाल्यास त्याची फळे उद्योजक किंवा नेतृत्वाला भोगावी लागतात. पूर्वीचे लोक सांगायचे तसं ' पाऊल जमीनीवर ठेवले ' तर अहंकारावर वेळोवेळी नियंत्रण करण्यास मदत होते.सध्याचे जग देवाणघेवाणीवर अवलंबून आहे. मग ते पैशांचे असेल किंवा इतर आत्मसन्मान सगळ्यांना प्रिय असतो.त्यामुळेच आपल्या सवंगडी, कर्मचारी, कार्यकर्ता किंवा सहकारी यांच्या मनात काय आहे हे ओळखून निर्णय घेतो तोच यशस्वी नेतृत्व प्रस्थापित करू शकतो.
Contingency approach of Management जोपासण्यासाठी चिखलात पडून प्रथम काम करावे लागते. ते फक्त नेतृत्व म्हणून अंदाजपंचे निर्णय सांगणे हे कंपनीच्या हिताचे नाही.अनेकदा संवादाचा अभाव हा नेतृत्वाला व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी धोकादायक ठरतो.अखेर प्रेमाने वागणूक मिळाल्यास आपल्या आदेशाचे ' आनंदाने ' पालन करण्यास सोपे जाते.आता संस्थानिकांचा काळ राहीला नाही.अधिकारांचे विकेंद्रीकरण केल्याशिवाय आजच्या घडीला गत्यंतर झाले आहे.सक्षम नेतृत्व अनेक लोकांचे जीवन बदलते.
संभाव्य धोके ओळखून त्वरीत कारवाई केल्यास अगदी कंपनीच्या हितसंबंध असणारे लोक देखील नेतृत्वाबत सकारात्मक प्रतिबिंबाचे दर्शन देतात. काय करावे यापेक्षा काय करू नये हे ओळखणे हे सजग नेतृत्वाचे द्योतक आहे.शेवटी व्यवसाय करणे हे फक्त नफ्यासाठी नसून समाज घडवण्याचे काम आहे.वेल्थ घडल्याने समाजाचे सबलीकरण होणार आहे.इतरांचे प्रश्न आपले प्रश्न समजून सोडवल्यास नेतृत्वाला देखील मानसिक पाठबळ मिळते जे अडीअडचणीला पुण्याई म्हणून साथ देतात.
सध्याच्या ग्लोबल काळात चतुरस्त्र कामगिरी करणाऱ्या नेत्यांचे भविष्य तगडे होऊ शकते कारण पारंपारिक कौशल्याव्यतिरिक्त आजच्या घडीला अंतर्गत व बाह्य प्रवाहाचा कौशल्य विकास केल्यास निश्चितच कंपनी काळानुसार प्रगती करते.अनिश्चितता ही सध्याच्या व्यवसायाची मुख्य समस्या आहे.कंपनीचे आर्थिक धोरण व सरकारचे धोरण, कुटनीती याचा सांगोपांग विचार केल्यास पुढील भाकीत करण्यास सुरुवात ह़ोते.शेवटी यांचा फायदा व्यवसायांना होतो. अनेकदा याचे नुकसानही होऊ शकते.समर्पक विचार न करता सल्लामसलत न करता एककल्ली निर्णय घेणे देखील धोकादायक ठरू शकते.सर्वात आधी उद्योजक व नेतृत्वाला देशाचे डायनॅमिक व डेमोग्राफिक आकलन होणे आवश्यक आहे.
समाजातील विविध घटक विविध समस्या, अस्तिवात असलेले नजरेतले दोषांची पाळेमुळे लक्षात घेतल्याने निश्चितच यांचा सर्वस्वी फायदा नेतृत्वशीर्षाला होणार आहे.नुकसान भरपाई आधी मग नफा ही मांडणी मनात पक्की केल्यास पाय जमीनीवर घट्ट रोवून नेतृत्वाला काम करता येते.यामुळे अर्थशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, भूगोल, सामान्यज्ञान यांचे बारीक कंगोरे विचारांती मनावर कोरल्यास यश आपलेच आहे.