खिचडी घोटाळ्यानंतर आता रेमडेसिव्हिर इंजेक्शन कुठे गेले याचा हिशोब ठाकरेंना द्यावा लागणार!
- भाजप नेते किरीट सोमैयांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
21-Oct-2023
Total Views | 76
मुंबई : महापालिकेतील आणखी एक कोविड घोटाळ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याआधी खिचडी चोरली आता रेमडेसिव्हिरची चोरी. मुंबई महापालिकेतून हजारो रेमडेसिव्हिरची चोरी झाली, 10,000 हून अधिक रेमडेसिव्हिर इंजेक्शन गायब झाले अशी तक्रार मी काही आठवड्यापूर्वी मुंबई पोलिस, प्रवर्तन निदेशालय (ED) आणि आयकर विभागाकडे केली होती. मुंबई पोलिस आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आता यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती मिळाली आहे. असे भाजप नेते किरीट सोमैया यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या खरेदी खात्याने हजारो रेमडेसिव्हिरची अपार्दर्शकरित्या खरेदी केली. 2020 मध्ये एका रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी रुपये 4,300 मोजले तर 2021 मध्ये रुपये 665 मध्ये रेमडेसिव्हिरचे करार असताना ही रुपये 1,600 नी रेमडेसिव्हिर इंजेक्शन विकत घेतले. करोडो रूपयांचे रेमडेसिव्हिर इंजेक्शन विकत घेतल्यानंतर त्याचे वितरण कसे झाले? कुठल्या हॉस्पिटल मध्ये कोणत्या पेशंटला ते देण्यात आले? त्याची माहिती देण्यासाठी मुंबई महापालिका तयार नाही. चौकशीत असे आढळले आहे की, हजारो रेमडेसिव्हिरचा रेकॉर्डच नाही. गायब झाले, चोरी झाली की पाठच्या मागच्या दारातून उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांच्या कॉन्ट्राक्टरच्या घरी डिलिव्हरी झाली.
या घोटाळा संबंधी आता एफ. आय. आर. गुन्हा दाखल झाला असून हे रेमडेसिव्हिर इंजेक्शन कुठे गेले याचा हिशोब ठाकरेंना द्यावा लागणार. असं किरीट सोमैया म्हणाले.