अनुभवा वन्यजीव जनजागृतीची नांदी!
वन्यजीव संवर्धनासाठी होणार लोककलांचा आविष्कार जेव्हा रंगमंचावर धुमाकूळ घालणार तुमचे आवडते कलाकार
ऊर्मिला कानेटकर, सुयश टिळक, अश्विनी कासार, सुकन्या काळण, महेश कापरेकर, सागर चव्हाण, ऋतुजा गद्रे आणि मकरंद सावंत यांच्यासोबत 50 लोककलावंत करणार वन्यजीव संवर्धनासाठी जनजागृतीचा जागर!
यंदा 11 श्रेणींमध्ये 15 व्यक्ती आणि संस्थांना ‘स्पिसीज अॅण्ड हॅबीटॅट्स वॉरियर्स अॅवॉर्ड - 2025’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह आणि 51 हजार ते 75 हजार रुपयांपर्यंत सहयोग निधी असे आहे. पुरस्कारार्थींचा कामाचा प्रवास हा भविष्यातही सुरू राहावा, म्हणून त्यांना भरभक्कम असा सहयोग निधी या पुरस्काराच्या माध्यमातून देण्यात येतो.
कार्यक्रमाचे इन्स्टिट्यूशनल पार्टनर
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) यांचे कार्यालय, द हॅबीटॅट्स ट्रस्ट, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मँग्रोव्ह फाऊंडेशन, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय, महाराष्ट्र पक्षी मित्र, सह्याद्री निसर्ग मित्र, सह्याद्री संकल्प सोसायटी, सृष्टीज्ञान आणि नॅचरलिस्ट फाऊंडेशन