महाराष्ट्र : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जात आहे. एमपीएससीअंतर्गत "अधिव्याख्याता" या पदाकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
एमपीएससीद्वारे केल्या जाणाऱ्या भरतीच्या माध्यमातून अधिव्याख्याता पदाच्या एकूण ८६ जागा भरल्या जाणार आहेत. तसेच, या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज करण्याची विहित मुदत दि. १९ ऑक्टोबर २०२३ ते दि. ०९ नोव्हेंबर २०२३ असणार आहे. या मुदतीनंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग उच्च व तंत्र शिक्षण विभाग भरती २०२३ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी अधिव्याख्याता पदाकरिता संबंधित विषयात किमान द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी आणि B.Ed. पदवी प्राप्त असणे बंधनकारक असणार आहे. तसेच, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३९४ रुपये अर्जशुल्क आकारले जाईल तर मागासवर्गीय किंवा आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी २९४ रुपये अर्जशुल्क आकारण्यात येईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग उच्च व तंत्र शिक्षण विभाग भरती २०२३ संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.