'एमएमआर' क्षेत्रात परवडणारी घरे! हावरे प्रॉपर्टीजची नवीन प्रकल्पाची घोषणा

नवीन परवडणारी हजारो घरे निर्माण करण्यासाठी " माय फर्स्ट होम" हा हावरे प्रॉपर्टीजचा अधिपत्याखाली नवीन ब्रँड लाँच

    18-Oct-2023
Total Views | 39
Haware
 
 
'एमएमआर' क्षेत्रात परवडणारी घरे! हावरे प्रॉपर्टीजची नवीन प्रकल्पाची घोषणा
 

नवीन परवडणारी हजारो घरे निर्माण करण्यासाठी ' माय फर्स्ट होम' हा हावरे प्रॉपर्टीजचा अधिपत्याखाली नवीन ब्रँड लाँच
 
 
मोहित सोमण  
 
 
मुंबई: गेल्या तीन दशक परवडणारी घरे या संकल्पनेचे जनक व मानक म्हणून डॉ सुरेश हावरे यांच्या हावरे प्रॉपर्टीजकडे पाहिले जाते. मुंबई महानगर प्राधिकरणाच्या क्षेत्रात सगळ्या वर्गातील परवडणारी पण ३६० डिग्री लक्झरीअस घरे बांधण्यासाठी हावरे प्रॉपर्टीजने एक पाऊल पुढे टाकत नवीन ब्रँड लाँच करत आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा मंगळवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केली गेली. यावेळी बोलताना ' सगळ्यांच्या आमच्यावरचा विश्वास हाच आमचा श्वास असल्याचा विश्वास पत्रकारांशी बोलताना केला.
 
कार्यक्रमाची सुरुवात करताना एक सुनियोजित प्रकल्पाची घोषणा करताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमित हावरे म्हणाले, ' परवडणारी घरे ही आमच्या ह्दययाच्या जवळची गोष्ट आहे. ' माय फर्स्ट होम ' सह आम्ही ग्राहकांच्या विस्तृत श्रेणीसाठी गृहप्रकल्प तयार करण्यासाठी आम्ही कौशल्याची जोड दिली आहे. स्वतः चे हक्काचे घर असणे हा ग्राहकांना आनंददायी अनुभव हे आमचे उद्दिष्ट आहे.आम्ही या अग्रगण्य उपक्रमांद्वारे हजारो कुटुंबांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी उत्सुक आहोत. ' माय फर्स्ट होम ' या ब्रँडसह MMR रिजन मध्ये अनेक आकाराच्या परवडणारी घरांसह आगामी काळात आम्ही जवळपास ५००० कोटी रुपयांच्या व्यवसायाचे लक्ष ठेवले आहे.रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या सहकार्याने गुणवत्ता आणि परवडण्याबाबतची आमची बांधिलकी आणखी बळकट झाली आहे.' असे उद्गार याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
 
 
अमित हावरे यांनी प्रोजेक्टस बद्दल विस्तृत माहिती देत माय होम प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रस्तूत केली.नवी मुंबईच्या विकासासाठी हावरे यांचे अग्रणी नाव असताना आता भविष्य हे शिळफाटा परिसर असल्याचे अमित हावरे यांनी यावेळी सांगितले.समाजाच्या विविध घटकांना या प्रकल्पात कोटा ठेवला जाणार आहे. सैनिक, पोलिस व इतर कष्टकरी कामगार व इतर वर्गाचाही यात समावेश असेल.
 
प्रकल्पाबाबत भाष्य करताना, ' सह व्यवस्थापकीय संचालक आणि सीएफ अमर हावरे म्हणाले ' आमचा ग्राहक केंद्रित दृष्टीकोन नेहमीच आमच्या यशाचा आधारस्तंभ राहिला आहे. ' माय फस्ट होम' हे आमच्या ग्राहकांप्रती असलेल्या आमच्या अतूट बांधिलकीचे प्रतिबिंब आहे.या ब्रँडच्या माध्यमातून आम्ही उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणारे ५० हून अधिक सुविधा जागतिक दर्जाचे लक्झरी फिनिश असलेले उंच टॉवर आहेत.Mivan व BIM सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर जलद बांधकाम आणि वेळेवर ताबा सुनिश्चित करेल जे आमच्या मूळ मूल्यांचा गाभा आहे.'
 
हा नवी मुंबई - शिळ येथील प्रकल्प मोक्याच्या जागेवर बांधून आम्ही कनेक्टिव्हिटीसाठी हा भव्य दर्जेदार प्रकल्प बांधला असल्याचे हावरे यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले.प्रकल्पाच्या युएसपी वैशिष्ट्यांबद्दल बोलताना वेळेवर ताबा,विश्वसनीयता, कनेक्टिव्हिटी, लवचिक पेमेंट,ऑन स्पॉट सवलत, तसेच सिंगल विंडो सेल, व कर्ज सुविधा ही प्रमुख उद्दिष्ट सांगितली.
 
मराठी माणसाचा मानबिंदू म्हणून रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख यांना या प्रकल्पाचे ब्रँड अंबेसेडर यावेळी घोषित करण्यात आले. मराठी माणूस व भारतात रितेश व जेनेलिया देशमुख अपील होतात.त्यांनी आमच्या प्रकल्पावर विश्वास ठेवल्याने आभारी असल्याचे अमित हावरे यांनी सांगितले.साधारण ३५ लाखांहून पुढे अशा किंमतीचे वेगवेगळ्या क्षेत्रफळाची १ बीएचके २ बीएचके, व मर्यादित प्रमाणात ३ बीचके असणार आहेत.
 
'आम्हाला हावरे प्रॉपर्टीज आणि त्यांच्या नवीन ब्रँड ' माय फस्ट होम' शी जोडले गेल्याबद्दल आनंद होत आहे.कारण त्यांचा ब्रँड मराठी समाजाशी खोलवर जोडला गेला आहे.' असे अभिनेते ब्रँड अंबेसेडर रितेश देशमुख यांनी सांगितले.
 
'ग्राहकांचा विश्वास हाच आमचा श्वास आहे.आमच्याकडे घर घेतलेला ग्राहक आमच्या घरातला सदस्य झालेला आहे.आम्ही त्यांच्या हिताची जपणूक करतो.ग्राहक त्यांचे अनुभवही आमच्याशी शेअर करतात. त्यांच्या सुख दुःखात सहभागी होऊन एक वेगळा आनंद मिळतो. आमच्याकडे घर खरेदी करण्याची विविध कारणे सहज सांगता येतील.सर्वसामान्य मुंबईकरांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प पुरक आहे.या प्रकल्पाला उत्तम कनेक्टिव्हिटी असून आम्ही हा प्रकल्प बांधायला सुरुवात केली आहे. प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद मिळेल असा अंदाज असून लवकर सगळ्या घराची बुकिंग पूर्ण होतील.जास्त दिवस बुकिंगसाठी जागा उरणार नाही.ही खूप दिवसांनी आलेली सुवर्णसंधी आली असून या प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट देऊन आपले स्वप्न साकार करा ही सगळ्यांना विनंती करतो. ' असे उद्गार कंपनीचे मुख्य संचालक डॉ सुरेश हावरे यांनी यावेळी काढले.
 
याशिवाय आनंद व्यक्त करताना अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी ' आमचा विश्वास आहे की प्रत्येकजण स्वतःच्या हक्काच्या घरात सुरक्षिततेसाठी आणि सोई सुविधांसाठी पात्र आहे आणि माय फस्ट होम या विश्वासाला मूर्त स्वरूप देतो. गुणवत्तेशी तडजोड न करता बजेट होम्ससाठी हा आकर्षक पर्याय ठरेल.'
 
 
आवश्यक त्या सगळ्या परवानग्या या प्रकल्पाला लाभल्या असून २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121