पल्लवी जोशीला 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटासाठी मिळाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार!
17-Oct-2023
Total Views | 214
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री पल्लवी जोशीला 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा किताब मिळाला आहे. या चित्रपटात जोशीने राधिका मेनन या पत्रकाराची भूमिका साकारली आहे, जी काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराची कहाणी उलगडण्याचा प्रयत्न करत आहे.
पुरस्कार मिळाल्यानंतर पल्लवी जोशीने माध्यमांशी संवाद साधला. ती म्हणाली, “’द काश्मीर फाइल्स'मुळे मी हा किताब जिंकला, याचा मला खूप आनंद झाला आहे. या चित्रपटात खुप मजबूत संदेश आहे. मी हे काश्मिरी पंडित नरसंहारातील सर्व पीडितांना समर्पित करते." अशी प्रतिक्रिया दिली.