ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ठाणे महापालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाना संपूर्णत: भाडेमाफ द्यावी अशी लेखी मागणी ठाण्याचे माजी महापौर व शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचेकडे केली आहे.
ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे भाडे माफ करून महापालिका प्रशासनाने मंडळांना दिलासा दिला होता. तसेच मागील वर्षी देखील नवरात्रोत्सव मंडळांचे भाडे माफ करण्यात आले होते. सर्व सार्वजनिक मंडळे सामाजिक उपक्रम राबवित असतात, या मंडळांचा शहराच्या जडणघडणीत मोलाचा सहभाग नेहमीच असतो. सामाजिक बांधिलकी जपत ही मंडळे गेली अनेकवर्षे काम करीत आहेत, या मंडळांना दिलासा मिळावा या दृष्टीकोनातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे संपूर्ण भाडे माफ केले होते, यामुळे सार्वजनिक मंडळांना निश्चितच दिलासा मिळाला आहे,
याच धर्तीवर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना देखील संपूर्ण भाडे माफी द्यावी अशी मागणी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी केली आहे. सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांचे भाडे माफ केल्यास या मंडळांना देखील दिलासा मिळेल, असा विश्वास नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.