आता आला आहे सेकेंड हॅन्ड आयफोन! मात्र घ्या ही काळजी

    07-Sep-2022
Total Views |

iphonme
 
 
सेकेंड हॅन्ड गोष्टी आपल्याला काही नवीन नाहीत. आपल्या घरगुती वापराच्या वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पर्यंत आपल्याला सर्वच प्रकारच्या गोष्टींच्या सेकण्ड हॅन्ड वस्तूंची सवय आहे. यात आत भर पडली आहे ती आयफोनची. आपल्याला खोटे वाटले तरी ही गोष्ट खरी आहे की आता आयफोन सुद्धा सेकेंड हॅन्ड खरेदी करता येणार आहे. आयफोनच्या जशा जशा नवीन नवीन सीरिज लाँच होत जातील तसे जुन्या सीरिजचे आयफोन आपल्याला सेकेंड हॅन्ड विकत घेता येतील. अँपल स्टोर मध्ये आपल्याला हा आयफोन घेता येईल.
  
 
कायमच आपल्या खिशाच्या क्षमतेच्या बाहेर असलेला अँपल फोन घेण्यासाठी अनेक जण पंचवार्षिक योजनाही आखतात, पण आता उपलब्ध होणारे सेकेंड हॅन्ड आयफोन हे आपल्याला अगदी ४० हजारांपर्यंत मिळू शकणार आहेत. सध्या अँपल १४ लाँच होण्याची प्रतीक्षा आहे. तेव्हा आता आपल्याला आधीच्या तीन सीरिजचे म्हणेज आयफोन १२, आयफोन १३ आणि आयफोन ११ सीरिजचे फोन सेकेंड हॅन्ड मिळू शकतात. आपल्या शहरातील कुठल्याही अँपल स्टोरमध्ये आपल्याला हे जुन्या सीरीजचे आयफोन विकत घेता येतील. तसेच फक्त ऑफलाईनच नव्हे तर ऑनलाईनही ते उपलब्ध असणार आहेत. फक्त ऑनलाईन खरेदी करताना काळजी मात्र घ्यावी लागणार आहे.
 
 
या सेकेंड हॅन्ड फोन्स मध्येही आपल्या खिशाला परवडेल अशाच पद्धतीने आपल्याला फोन घेता येऊ शकतो. जर आपल्याला थोडा महाग फोन परवडू शकतो तर आपण आयफोन १३ घ्या. जर थोडा अजून महाग परवडत असेल तर आयफोन १२ घ्या. जर अगदी आपल्या पॉकेट्मनी मध्ये पैसे साठवून आपल्याला फोन घ्यायचा असेल तर आयफोन ११ घ्या. हे सर्व फोन त्यांच्या जुन्या मूळ किमतीपेक्षा जवळपास २५ हजारांनी कमी किंमतीत मिळणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आता आपल्यालाही आयफोन घेणे शक्य होणार आहे.
 
 
मात्र आहे आयफोन घेताना काही गोष्टींची काळजी मात्र घ्यावी लागणार आहे.
 
 
१ ) जेव्हा आपण हा सेकेंड हॅन्ड आयफोन घेऊ तेव्हा आपल्या आधीच्या वापरकर्त्याने त्याचा किती वापर केला आहे हे तपासून घ्या.
 
२ ) त्याचे सर्वच कॅमेरा, बटण, मायक्रोफोन इ. गोष्टी व्यवस्थित आहेत की नाहीत याची खात्री करून घ्या. कारण त्याची वेळीच छाननी केली तरच आपल्याला चांगल्या दर्जाचा फोन मिळेल.
 
३ ) सुरुवातीला फोन घेताना आपल्याला आधीच्या वापरकर्त्याची सर्व माहिती डिलीट करून, आपली फोन मेमरी पूर्ण क्लीन करून घ्यावी. तसेच त्या फोनला लिंक असलेली सर्वच अकाउंट्स डिलीट करून घ्यावीत त्यामुळे आपल्याला पूर्ण नव्या सारखा फोन मिळेल.
 
४ ) सेकेंड हॅन्ड फोन घेताना त्या फोनची वॉरंटी वगैरे सर्वच गोष्टींची माहिती करून घ्यावी त्यामुळे आपल्याला खात्रीलायक फोनच मिळेल याची खात्री करून घ्या.
 
या सर्व गोष्टींची खातरजमा करून घेतल्यानंतरच सेकेंड हॅन्ड फोनचा वापर करावा आणि घ्यावा नाहीतर फसवणूकच होण्याची जास्त चिन्हे आहेत.