रत्नागिरीत आदित्य ठाकरे आणि अनिल परब एकत्र!; रिफायनरी प्रकल्पाबाबत दिली मोठी प्रतिक्रिया!
16-Sep-2022
Total Views | 130
6
रत्नागिरी: महाराष्ट्रभर शिवसंवाद यात्रा सुरु असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. राज्याचे विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांचा हा मतदारसंघ असून सध्या वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावरून या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आज रत्नागिरी दौऱ्यावर आदित्य ठाकरे दाखल झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत मोठा हलगर्जीपणा झाल्याची चर्चा होती.
आदित्य ठाकरे हे दुपारी 12.40 च्या दरम्यान रत्नागिरी विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक आणि सुरक्षारक्षकही उपस्थित होते. मात्र त्यांना झेड दर्जाची सुरक्षा असूनही, तशा पद्धतीचं सुरक्षा कवच दिसलं नाही. त्यांच्या ताफ्यात खासगी गाड्या असल्याचं दिसून आलं. आदित्य ठाकरे यांना झेड दर्जाची सुरक्षा आहे.
या सुरक्षेमध्ये राज्याच्या गृहविभागाने सुरक्षा रक्षक दिले पण त्यांना पोलीस गाड्या दिल्या नाहीत. त्यामुळे या दौऱ्यासाठी सुरक्षा रक्षक खासगी वाहनाने आले. झेड सुरक्षेतील सुरक्षा रक्षकांना गृह विभाग गाड्या देते पण आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी आलेल्या सुरक्षा रक्षकांना गाड्या दिलेल्या नाहीत, असा आरोप करण्यात येत असून जर कायदा सुव्यवस्था बिघडला तर त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात येत आहे.
दरम्यान, या दौऱ्यात वेदांता-फॉक्सकॉनप्रमाणे रिफायनरी प्रकल्प बाहेर जाऊ नये, म्हणून शिवसेनेनी या प्रकल्पाला समर्थन करावे, अशी मांडणार भूमिका आहेत. रिफायनरी समर्थकांसोबतच विरोधकही आदित्य ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी दौऱ्यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची धोपेश्व्रर रिफायनरी समर्थक मोठ्या संख्येनी भेट घेणार आहेत. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचे पत्र राजापूरमधील शिवसैनिकच देणार आहेत.